NDCC latest news : जिल्हा बँकेकडून 151 कोटींची परतफेड

NDCC Bank latest marathi news
NDCC Bank latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असतानादेखील नाशिक जिल्हा सहकारी बँक (NDCC Bank) सक्षम करण्यासाठी प्रशासकांकडून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. यातूनच शिखर बँकेकडून घेतलेले कर्ज (Loan) मुदतीत भरण्यासाठी योग्य जिल्हा बँक प्रशासकांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. बँकेने कर्जापोटी घेतलेले २२५ कोटींपैकी १५१ कोटी रुपये शिखर बँकेस अदादेखील केले आहे.

जिल्ह्यातील सभासद आणि ठेवीदारांना कर्ज व त्यांच्या ठेवी देत आर्थिक साखळी चालविण्याच्या उद्देशाने जिल्हा बँक ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई लि.(शिखर बँक) यांच्या दरवर्षी कर्ज घेते. २०१६- १७ पर्यंत जिल्हा बँकेची आर्थिक क्षमता चांगली असल्याने शिखर बँकेकडून जिल्हा बँकेला साधारण ७२५ कोटी रुपये मिळत होते. (Reimbursement of 151 crores from District Bank to shikhar bank nashik NDCC Latest Marathi News)

मात्र, २०१६ नंतर आलेल्या नोटबंदीमुळे जिल्हा बँकेची पत ढासळली. बँकेला कर्जाच्या स्वरूपात होणारी वसुली थांबली. ठेवीदारांकडून ठेवीच्या स्वरूपात ठेवलेल्या पैशांची मागणी केली जाऊ लागली. यामुळे बँकेची आर्थिक कोंडी झाली व बँक आर्थिकदृष्ट्या अस्थिर बनली. यामुळे शिखर बँकेकडून जिल्हा बँकेच्या कर्ज पुरवठ्यामध्ये वेळोवेळी कपात करण्यात आली.

जिल्हा बँकेची आर्थिक सक्षमता व बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देणे, कर्जाची वसुली करणे, ठेवीदारांच्या ठेवी त्यांना देणे या उद्देशाने बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली. बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्तीची कर्जवसुली, जप्त वाहनांचा लिलाव, शेतजमिनीचा लिलाव करून कर्ज वसुलीला चालना देण्यात आली.

याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षापासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखानादेखील २५ वर्षाच्या करारावर भाडेतत्वावर देण्यात आला आहे. ठेवीदारांनादेखील गरजेप्रमाणे ठेवी देत आहेत. बँकेचे आर्थिक संतुलन टिकवून ठेवत सक्षम करण्यासाठी चालूवर्षी जिल्हा बँकेने ९.५० टक्के व्याजदराने शिखर बँकेकडून २२५ कोटी उचलले होते.

सदर कर्जापोटी अतिरिक्त व्याज दिले जाऊ नये या उद्देशाने जिल्हा बँकेने योग्य आर्थिक नियोजन करत आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करत शिखर बँकेचे सुमारे १५१ कोटी रुपये परत केले आहे. यासह उरलेले ७४ कोटी रुपये मुदतीत फेडण्यासाठी योग्य नियोजन देखील करण्यात आले आहे.

NDCC Bank latest marathi news
Rain Update : आदिवासी भागासह गंगापूर धरण पाणलोटात मुसळधार

"जिल्हा बँक सद्यःस्थितीतदेखील आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. बँकेला आर्थिक सक्षम करण्यासाठी काही कठोर पावले उचलत कर्जाची वसुली केली. यामुळे ठेवीदारांसह शिखर बँकेकडून घेतलेले कर्ज मुदतीत फेडू शकणार आहोत. ठेवीदार व सभासद शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत विश्‍वास संपादित केला जात आहे. थकीत कर्जदारांनीदेखील बँकेला मदत करत पुन्हा गतवैभव मिळवून द्यावे."

- अरुण कदम, प्रशासक, जिल्हा सहकारी बँक, नाशिक

NDCC Bank latest marathi news
Nashik : गणेशमूर्ती कारागिरांना महापालिकेकडून नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.