Revenue Week: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास नवसंजीवनी; महसूल सप्ताहात प्रशासनाकडून मदतीचा हात

Updated on

Revenue Week : वळवाडे (ता. मालेगाव) येथील नयना बाजीराव पाटील या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास महसूल सप्ताह अंतर्गत मदतीचा हात मिळाल्याने कुटुंबीयांना नवसंजीवनी मिळाली आहे.

या कुटुंबीयांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्ज वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कमी करून कुटुंबीयांनी भरले.

यासाठी येथील तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी पुढाकार घेतला. कर्ज बोजा कमी करून नील झालेला सातबारा उतारा श्रीमती पाटील यांना गुरुवारी (ता.३) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आला.

त्याचबरोबर तहसील कर्मचाऱ्यांनी संकलन केलेल्या निधीतून श्रीमती. पाटील यांना शिलाई मशिन देण्यात आले. (Rejuvenation of Farmer Suicide Family helping hand from administration during revenue week nashik news)

वळवाडे येथील बाजीराव पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. त्यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्राचे मोठ्या रकमेचा कर्ज बोजा सातबारा उताऱ्यावर होता.

त्यातच घरी वृद्ध सासूबाई व मुलांची जबाबदारी सांभाळतानाच श्रीमती. पाटील यांची दमछाक होत होती. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना परिस्थिती कथन केली.

श्री. देवरे यांनी उभारी योजनेअंतर्गत पुढाकार घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. कर्जाबाबत चर्चा करून पुढाकार घेतला.

बँकेचे अधिकारी तुषार भदाणे, जितेंद्र साळुंखे, अमित केसकर यांनी त्यांच्या महासंवेदना अभियानातून कर्ज बोजा वन टाइम सेटलमेंट मधून कमी करून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

कर्ज भरणा केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी बोजा कमी करण्याबाबत तत्काळ पत्र दिले. तहसीलदार देवरे यांनी केवळ एका दिवसात सदर बोजा कमी करण्याचा आदेश दिल्याने तलाठी मनीषा जाधव यांनी बोजा कमी करून दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Revenue Week: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास नवसंजीवनी; महसूल सप्ताहात प्रशासनाकडून मदतीचा हात
Nashik Citylinc Employees Strike: सिटी लिंक बससेवा पुन्हा ठप्प! वेतनाअभावी वाहक पुन्हा एकदा बेमुदत संपावर

सदर बोजा कमी केलेला सातबारा श्रीमती पाटील यांना देण्यात आला. त्याचबरोबर संजय गांधी विधवा योजना, तसेच कुटुंबात साहाय्य योजनेचा लाभ श्री. देवरे यांनी मिळवून दिला. या आधाराने श्रीमती पाटील भारावून गेल्या.

त्यांनी महसूल प्रशासन व बँकेचे आभार मानले. यावेळी प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार देवरे उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता

येथील महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार, लिपिक, अव्वल कारकून व तलाठी यांनी जमा केलेल्या निधीतून उभारी योजनेअंतर्गत तीन महिलांना शिलाई मशिन देण्यात आले.

प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी वर्गाने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Revenue Week: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास नवसंजीवनी; महसूल सप्ताहात प्रशासनाकडून मदतीचा हात
Nashik Water Crisis: जलकुंभ उदंड, तरीही पाण्याचा ठणठणाट; नियोजनाअभावी टंचाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.