Nashik Inspirational News: भुकेलेल्यांना अन्न; हीच खरी भक्ती! त्यांच्या नित्यनेमाने रुग्णांच्या नातलगांना दररोज मिळतेय भोजन

‘साईब्लेस फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातलगांना जेवण दिले जाते.
Relatives of patients at civil hospital nashik getting food every day due to saibless foundation routine humanity news
Relatives of patients at civil hospital nashik getting food every day due to saibless foundation routine humanity newsesakal
Updated on

नाशिक : सुख-चैन असलेल्या घरांत, कार्यक्रमात, लग्नसोहळ्यातून कितीतरी अन्नाची नासाडी होत असल्याचे चित्र एका बाजुला असताना, दुसऱ्या बाजुला अनेकांना एकावेळचे अन्नही मिळणे मुश्किल असते.

त्यातही, सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या गोरगरिबांच्या नातलगांकडे जेवण घेण्यासाठीही पैसे नसतात.

‘भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी... हाच आजचा रोकडा धर्म... हीच खरी भक्ती, देवपूजा’ या संत गाडगे महाराज यांच्या उपदेशाप्रमाणेच, ‘साईब्लेस फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातलगांना जेवण दिले जाते. (Relatives of patients at civil hospital nashik getting food every day due to saibless foundation routine humanity news)

त्र्यंबकरोडवर जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये केवळ शहर वा जिल्ह्यातीलच रुग्ण उपचारासाठी  येतात असे नव्हे तर, परजिल्ह्यातील, विशेषत: जिल्ह्यालगतच्या परजिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांवरचे रुग्ण उपचारासाठी येत असतात.

अगदी लगतच्या राज्यातूनही रुग्ण या रुग्णालयात येतात. आदिवासी, गोरगरिब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच असते. उपचारार्थ दाखल रुग्णाला रुग्णालयातून जेवण मिळते.

परंतु या रुग्णासमवेत असलेल्या नातलगाला मात्र बाहेरून विकतचे खाणे न परवडणारे असते. त्यामुळे अनेकांना वडापाववरच दिवस काढावे लागतात.

मात्र, साईब्लेस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवावृत घेतलेल्यांनी एकत्र येत त्यांच्याच स्वत:च्या स्वखर्चातून हे फाऊंडेशन उभे केले आणि या माध्यमातून ते जिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातलगांना दररोज सायंकाळी जेवण देतात.

कधी दोन नागलीची भाकरी-भाजी, तर कधी मसाला पुलाव, कधीकधी गोड शिराही देतात. दररोज सायंकाळी सात वाजता न चुकता जेवण दिले जाते.

Relatives of patients at civil hospital nashik getting food every day due to saibless foundation routine humanity news
Inspiring Success Story : नोकरीची ‘प्रतीक्षा’ न करता व्यवसायात घेतली गगनभरारी

आतुरतेने करतात प्रतिक्षा

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच रुग्णांचा नातलग बसलेले असतात. त्यांना माहिती असल्याने ते बरोबर सहा-साडेसहाच्या सुमारास पोलीस चौकी शेजारी असलेल्या आवारात आतुरतेने रांग लावून बसतात. पुरुषांची अन्‌ महिलांची स्वतंत्र रांग असते. ‘साईब्लेस फाऊंडेशन’च्या डॉ. प्रिया डिगरसे या स्वत:च्याच घरी अन्न शिजवून आणतात.

प्रत्येकाला दोन नागलीची भाकरीसमवेत भाजी देतात.  मूळच्या नागपूरच्या असलेल्या डॉ. प्रिया या नाशिकमधील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या योगदानातून हा उपक्रम तीन वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला आठवड्यात दोन वेळा तर गेल्या काही महिन्यांपासून दररोज अन्नदान केले जात आहे.

"या ठिकाणी येणारा रुग्ण आधीच खचलेला असतो. त्यांच्या पोटाला अन्न मिळावे याच उद्देशाने उपक्रम सुरू केला. यातून खरी सेवाभाव जपल्याचे समाधान मिळते, ते अलौकिक आहे."

- डॉ. प्रिया डिगरसे, साईब्लेस फाऊंडेशन

Relatives of patients at civil hospital nashik getting food every day due to saibless foundation routine humanity news
Inspiring Success Story : नोकरीची ‘प्रतीक्षा’ न करता व्यवसायात घेतली गगनभरारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.