Nashik Crime : गेल्या गुरुवारी (ता. २४) भरदिवसा सिडकोतील शिवाजी चौकात संदीप आठवले याचा खून करण्यात आला. तर शुक्रवारी (ता. २५) रात्री मयत आठवलेच्या नातलग व मित्र असलेल्या युवकांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करीत हैदोस घातला.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या महिना-दीड महिन्यात सातत्याने होत असलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक दहशतीच्या छायेखाली आले आहेत.
तर दुसरीकडे सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही गुन्हेगारी घटनांना आळा बसत नसल्याने पोलिसांविरोधात टीकेची झोड उठली आहे. (relatives of shivaji chawk murder victim vandalized cars Goon crimes Continue Citizens Panic in cidco Nashik Crime)
मयत संदीप आठवले याने महिन्याभरापूर्वी ओम चौधरी उर्फ खटकी (१९) यास बेदम मारहाण केली होती. त्या मारहाणीचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरलही केले होते.
या सुडाच्या भावनेतूनच खटकी व त्याच्या मित्रांनी संदीपचा गेल्या गुरुवारी (ता. २४) काटा काढला. त्यानंतर खटकी यानेही सोशल मीडियावर संदीपला गेम केल्याबददलचा व्िहडिओ व्हायरल केला.
त्यानंतर पोलिसांनी काही तासात संशयिताला अटक केली. परंतु मयत आठवले याच्या नातलगांनी पोलिस यंत्रणा वेठीस धरण्याचा प्रयत्नही केला. त्याच प्रयत्नातून मयत आठवले याच्या नातलग व मित्रांनी शुक्रवारी (ता. २५) रात्री शिवाजी नगर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली.
एका फुड डिलिव्हरी बॉयची दुचाकी अडवून त्याच्याकडील पैसे बळजबरीने हिसकावून घेत त्याच्याही गाडीची तोडफोड केली.
यात तीन दुचाक्या आणि दोन चारचाकी वाहनांचे नुकसान संशयितांनी केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात तीन अल्पवयीन संशयितांविरोधात जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
व्हिडिओतील ‘तो’ कोण?
शुक्रवारी रात्री वाहनांवर दगड टाकून नुकसान करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दिसणारा संशयित व्यक्ती धडधाकट असताना, पोलिसांनी मात्र तीन अल्पवयीन संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
तसेच, सदरच्या घटनेनंतर अंबड पोलीस मयत आठवले याच्या घरी तोडफोडप्रकरणी तपासासाठी गेले असता तेथील काही नातलगांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तेथील जमाव व रोष पाहता पोलिसांना काढता पाय घ्यावा लागला.
परंतु, पोलिसांनी ज्या तीन अल्पवयीन संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे, त्यासंदर्भात नागरिकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून व्हिडिओत दुचाकीवर दगड टाकणारा संशयित कोण? याचा संभ्रम निर्माण झाला आहे. की पोलिस दबावाखाली कारवाई करीत आहेत, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिसांवर टीकेची झोड
अंबड पोलीस ठाणे गेल्या दीड महिन्यात गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या पटलावर ठळकपणे आले आहे. तसेही गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून अंबड पोलीस ठाणे कधी पोलीस अधिकार्यांच्यावरील आरोपांमुळे तर कधी गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहे.
त्यामुळे काही महिन्यांमध्ये सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांमध्ये चार वेळा खांदेपालट झाली आहे. असे करूनही अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता नांदताना दिसत नाही.
सातत्याने वाहनांची तोडफोड, खुलेआम गुन्हेगारांकडून होणारे हल्ले, वर्चस्वाच्या वादातून टोळ्यांमध्ये हाणामार्या यासारख्या गंभीर स्वरुपाचे प्रकार घडत आहेत.
या घटनांना आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही गुन्हेगारी घटना थांबलेल्या नाहीत. परिणामी पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.
"अंबड हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढली जाईल. गाड्याच्या तोडफोड प्रकरणात तीन अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतलेले आहे. कोणत्याही गुन्ह्यातील संशयितावर कठोर कारवाई केली जाईल. "- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.
"गाड्याच्या तोडफोडप्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघांच्याही जन्मतारखेच्या पुराव्यानुसार ते अल्पवयीन आहेत. त्यांच्याविरोधात हल्ला करून लुटमार करण्यासह वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे."
- नईद शेख, पोलीस उपनिरीक्षक, अंबड पोलीस ठाणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.