सिन्नर (जि. नाशिक) : पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणूक (Panchayat Samiti Election) 2022 साठी आज दि. 28 तहसीलदार राहुल कोताडे यांनी 14 गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या उतरत्या क्रमाणे आरक्षण काढण्यात आले. (Release of reservation for Sinnar Panchayat Samiti elections announced nashik Latest marathi news)
सिन्नर तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, परीविक्षाधिन नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी व संभाव्य इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
सन 2011 च्या जनगणनेनुसार गणनिहाय समाविष्ट गावांची लोकसंख्या विचारात घेऊन तसेच सन 2002 ते 2017 या कालावधीत झालेल्या चार पंचवार्षिक निवडणुकांचे मागील आरक्षण विचारात घेऊन सन 2022 च्या निवडणुकीसाठी सोडत काढण्यात आली.
यात 7 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या एका जागेसाठी नांदूर शिंगोटे गण थेट आरक्षित करण्यात आला जागा व ही जागा महिला राखीव म्हणून घोषित करण्यात आली.
अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या दोन जागा सोमठाणे व शहा गणांसाठी जाहीर करून त्यापैकी शहा गण चिठ्ठीद्वारे महिलेसाठी आरक्षित करण्यात आला. नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गाच्या तीन जागांसाठी मागासवर्ग आयोगाने केलेल्या सूचनेनुसार लोकसंख्येची 23.9 टक्केवारी सिन्नर पंचायत समितीसाठी निश्चित करण्यात आली होती.
त्यानुसार गणातील ओबीसी लोकसंख्या व मागील आरक्षणाचा विचार करून गुळवंच, मुसळगाव व दापूर या गणांसाठी आरक्षण टाकण्यात आले. त्यापैकी गुळवंच व दापुर हे दोन गण महिला आरक्षित करण्यात आले तर मुसळगाव ही जागा ओबीसी सामान्य व्यक्तीसाठी राहिली.
सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून वावी, पांगरी बुद्रुक हे दोन गण सोडतीने महिला राखीव ठेवण्यात आले. नायगावची जागा मागील आरक्षण क्रमाने थेट राखीव जाहीर करण्यात आली. तर माळेगाव, डुबेरे, पांढुर्ली, शिवडे ठाणगाव हे पाच गण सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींसाठी घोषित करण्यात आले. ऋषिकेश जाधव या चिमुरड्याच्या हस्ते आवश्यकतेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली.
नांदूर शिंगोटे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथील मातब्बर इच्छुकांचा हिरमोड झाला. पांगरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाशी संलग्न वावी व पांगरी बुद्रुक हे दोन गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने तेथे तयारी करणाऱ्या पुरुष इच्छुकांना थांबावे लागणार आहे.
लक्षवेधी लढत होणाऱ्या सोमठाणे जिल्हा परिषद गटांतर्गत सोमठाणे व शहा हे दोनही गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथेही इच्छुकांची पंचायत झाली आहे.
सिन्नर पंचायत समिती आरक्षण...
सर्वसाधारण (आठ जागा)- डुबेरे, पांढुर्ली शिवडे, ठाणगाव, माळेगाव खुला तर वावी, पांगरी बु. व नायगाव गण महिला राखीव.
ओबीसी (तीन जागा) - गुळवंच, दापुर महिला राखीव तर मुसळगाव गण खुला.
अनुसूचित जमाती (2 जागा) - सोमठाणे खुला तर शहा महिलेसाठी राखीव.
अनुसूचित जाती - (1 जागा) - नांदूर शिंगोटे गण महिला राखीव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.