Nashik News : मोकळ्या भूखंडावर महापालिकेकडून कर लावल्यानंतर त्याच भूखंडावर इमारत झाल्यानंतरदेखील कर लागू होत असल्याने दुबार कर नोंदणीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागाने राबविलेल्या मोहिमेअंतर्गत ३२ कोटी २२ लाख रुपयांचा कर कमी झाल्याने दुबार कराची नोंदणी असलेल्या मिळकत धारकांना दिलासा मिळाला आहे.
स्थायी समितीची बुधवारी (ता.६) सभा होणार असून यात १२,४४८ खुल्या भूखंडावरील दुबार कर आकारणी रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. (Relief to double tax registered income holders from NMC nashik news)
उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेकडून मोकळ्या भूखंडावरदेखील कर लावला जातो. कर लावल्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू राहते, मात्र ज्या मोकळ्या भूखंडावर कर लागू होतो. त्याच मोकळ्या भूखंडावर इमारत किंवा बंगला उभा राहिल्यास घरपट्टीच्या माध्यमातूनदेखील कर लागू होतो. नियमाप्रमाणे एकाच मिळकतीवर दोन कर महापालिकेला लागू करता येत नाही व संबंधित मिळकत धारकानेदेखील एकच कर अदा करायचा असतो.
मात्र महापालिकेकडून दोन्ही कर भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या जात असल्याने नागरिकांना दुहेरी कराचा सामना करावा लागत होता. मात्र उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दुहेरी कर असलेल्या मिळकतींवर एकेरी कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने महापालिकेकडे असलेल्या ३१ हजार १६३ इमारतींवरचा दुहेरी कराचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांनीदेखील स्वतःहून पुढे येऊन दुहेरी कर रद्द करण्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळून आतापर्यंत १२,४४८ मोकळ्या भूखंडावरील दुबार करांची आकारणी रद्द करण्यात आली आहे. दुबार करांची वजावट करण्यात आल्याने थकबाकी दिसत असलेल्या एकूण रकमेमधून जवळपास ३२.२२ कोटी रुपयांच्या थकबाकीची वजावट होणार आहे.
बुधवारी (ता. ७) स्थायी समितीची सभा होणार असून त्यात प्रस्ताव सादर केला जाणार आहे सहा विभागांची स्वतंत्र प्रस्ताव कर विभागाकडून सादर केले जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर थकबाकीचा फुगवटादेखील कमी होणार आहे.
''शहरात १२४८ मोकळ्या भूखंडावर इमारत उभी राहिल्यानंतर देखील दुहेरी कर लागू होता आता तो कर रद्द करण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून ३२ कोटी २२ लाख रुपयांच्या थकबाकीचा फुगवटा देखील कमी होणार आहे.''- श्रीकांत पवार, विविध कर उपायुक्त, महापालिका.
विभाग दुहेरी कर आकारणी भूखंड संख्या निर्लेखित झालेली थकबाकी(कोटी रुपया)
सातपूर २५६२ ४.३४
पश्चिम ४०९ २.८८
पूर्व २०३८ ११.९१
पंचवटी २९४४ ४.६४
सिडको ३०४२ ५.५५
नाशिक रोड १४५३ २.८७
एकूण १२,४४८ ३२.२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.