वयम् चळवळीच्या मदतीने आदिवासींना दिलासा | Nashik

Tribal-Community
Tribal-Communityesakal
Updated on

मूलवड (जि. नाशिक) : मूलवड परिसरातील सादडपाना, धायटीपाडा, घोडीपाडा, काथवडपाडा, उंबरदरी, कौलपौंडा, देवडोंगरी या गावांमधील आदिवासी बांधवांची १५ वर्षांपासून वनहक्क जमिनीसाठी फरपट सुरू आहे. आजपर्यंत वनहक्क धारकांचे शासनदरबारी दाखल केलेल्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविण्यात आली. शासनाकडे वनहक्कधारक आदिवासी बांधवांचे म्हणणे ऐकून घ्यायला कोणीच तयार नव्हते.

जिल्ह्यात ४०० च्या वर वनहक्क दावे प्रलंबित आहेत, तर मूलवड, देवडोंगरी परिसरातील १२० दावे प्रलंबित आहेत. शेवटी अडीच ते तीन वर्षांपूर्वी वयम् चळवळीने या प्रकरणात लक्ष घालून मूलवड,दे वडोंगरी परीसरातील संपूर्ण वनहक्कधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात दाखल केले, पण कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक जबाब व स्थानिक पंचनामे हे दोन पुरावे असूनही तालुका पातळीवर प्रांतने प्रस्ताव फेटाळले. परत वनहक्कधारकांचे नवीन प्रस्ताव दाखल करून जिल्हा समिती, विभागीय समितीकडे दाखल केले. शेवटी वरील दोन्ही पुराव्यासोबत २००५ अगोदरच्या वन विभागाच्या दंडाच्या पावत्या पुरावा म्हणून मागितल्या. बऱ्याच लोकांच्या पावत्या गहाळ झाल्यामुळे पुरावा देता आला नाही. शेवटी जिल्हा समितीने पुन्हा प्रस्ताव फेटाळले. वनहक्कधारक आदिवासीबांधव हताश झाले व दाद मागावी कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा वयम् चळवळीचे कार्यकर्ते व स्थानिक विद्यार्थी नामदेव टोकरे सक्रिय होत विभागीय समितीसमोर सर्व वनहक्कधारकांचे दाखल केलेले पुरावे खोटे आहेत, हे गृहीत धरण्याऐवजी उपग्रह आधारित जीपीएस प्रणालीद्वारे जमीन मोजण्याची मागणी केली. वयम् चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मोजणी करून २००४ व २०२१ मधील वन जमिनीचे छायाचित्रे समिती पुढे सादर केले. त्यात स्पष्ट शेतजमीन दिसत आहे. हे बघून समितीमधील सर्वच अधिकारी चकीत झाले. वयम् चळवळीच्या कार्यकर्त्यांनी वनहक्कधारकांचे पुरावे खरे असून, गरीब आदिवासी बांधवांवर अन्याय करू नका, अशी मागणी केली.

Tribal-Community
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली

शेवटी समितीने मागणी मान्य करत उर्वरित वनहक्कधारकांना उपग्रह आधारित छायाचित्रे काढण्यासाठी वेळ दिला. त्यामुळे परीसरातील जवळपास दीडशे वनहक्कधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या लढ्यासाठी आजपर्यंत वनहक्कधारकांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत व शासनाच्या ‘तारीख पे तारीख’ कार्यक्रमाला धैर्याने लढा देत आहेत. या सर्व वनहक्कधारकांचे नेतृत्व सादडपाना येथील पदवीधर विद्यार्थी नामदेव टोकरे करीत असून, वयम् चळवळीच्या माध्यमातून तो स्वखर्चाने रात्रंदिवस आपल्या बांधवांसाठी वनहक्क पुरावे गोळा करीत आहे. व शासनाशी लढा देत आहेत. या सर्व प्रकरणात लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले, तर सर्वच वनहक्कधारकांना न्याय मिळेल, अशी परिसरातील सर्व आदिवासी बांधवांची मागणी आहे.

Tribal-Community
ढगाळ हवामानाने द्राक्षनगरी हबकली | Nashik

आदिवासी बांधवांचा पंधरा वर्षांपासून लढा देत आहेत. पुरावे असून शासन आदिवासी,गरीब,शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार आहे. - नामदेव टोकरे, वनहक्कधारक विद्यार्थी, सादडपाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()