Nashik News: मालेगावात प्रशिक्षणाच्या नावाखाली धार्मिक प्रचार! हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धाव

madarsa.
madarsa.esakal
Updated on

Nashik News : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात येथील सत्यमलिक लोकसेवा ग्रुपतर्फे पुण्याच्या अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटतर्फे करिअर संदर्भात प्रशिक्षणा दरम्यान इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात आल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद पाडला.

यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. रविवारी (ता.११) दुपारी हा प्रकार घडला. पोलिस वेळीच पोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Religious propaganda in name of training in Malegaon Hindutva activists Nashik News)

येथील सत्यमलिक लोकसेवा ग्रुपतर्फे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. सकाळी साडेदहाला मसगा महाविद्यालयात तर दुपारी चारला शहरात हा कार्यक्रमात होणार होता. महाविद्यालयात कार्यक्रम सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मेसेज पाठवत माहिती दिली.

कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन जाब विचारला. महाविद्यालयाजवळ लावण्यात आलेल्या बॅनरवरही त्यांनी आक्षेप घेतला. प्रशिक्षणाच्या नावाखाली इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद पाडला.

शैक्षणिक प्रशिक्षणापेक्षा इस्लामी धर्माविषयी जास्त माहिती दिली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिस घटनास्थळी पोचल्याने वातावरण शांत झाले. यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने छावणी पोलिस ठाण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. दरम्यान सायंकाळचा शहरातील दुसरा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विनापरवानगी कार्यक्रम

महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी या कार्यक्रमाला संस्थेने परवानगी दिलेली नव्हती. प्राचार्यांनी व्यवस्थापन समितीची परवानगी घेतलेली नव्हती.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संस्थेचे विश्‍वस्त व प्राचार्य बी. एस. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत प्राचार्यांना निलंबित करण्यात आल्याचे कळविले आहे.

madarsa.
Railway Chain Pulling Case : मे महिन्यात चेन ओढण्याचा 941 घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.