Nashik: नववर्षाचे औचित्याने बहरले धार्मिक पर्यटन! सलग सुटीमुळे भाविक, पर्यटकांची विविध मंदिरांत दर्शनासाठी गर्दी

गत दोन दिवसांपासून पंचवटीतील विविध मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे.
Due to the welcome of New Year and the accompanying holiday, the Kalaram Temple and Sita Cave witnessed a rush of devotees and tourists for darshan on Monday.
Due to the welcome of New Year and the accompanying holiday, the Kalaram Temple and Sita Cave witnessed a rush of devotees and tourists for darshan on Monday.esakal
Updated on

नाशिक : शनिवार, रविवार या विकएंडला जोडून आलेल्या नववर्षाची पर्वणी साधत गत दोन दिवसांपासून शहरात धार्मिक पर्यटन चांगलेच बहरल्याचे दिसून आले.

गत दोन दिवसांपासून पंचवटीतील विविध मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. निसर्गरम्य तपोवनातही पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे. (Religious tourism blossomed on occasion of New Year Due to consecutive holidays devotees tourists rush to visit various temples Nashik)

एकमुखी दत्त जयंतीपासून पर्यटकांची गर्दीत वाढ झाली आहे. शनिवार, रविवारी तर म्हसोबा, गौरी पटांगणावरील पार्किंगची जागा अक्षरश हाऊसफुल्ल झाली होती.

यावरून गर्दीची कल्पना यावी. मोठ्या संख्येने यात्रेकरू आल्याने स्थानिक व्यवसायातही काही प्रमाणात तेजी आली आहे. येथील श्री काळाराम मंदिरासह, सीता गुंफा, कपालेश्‍वरी दर्शनासाठी गर्दी उसळत आहे.

सोमवारी (ता. १) दुपारपर्यंत काळाराम मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होती. या ठिकाणी आलेल्या सहलीतील मुली मंदिराच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न होत्या. सीतागुंफा येथेही मोठी गर्दी होती.

Due to the welcome of New Year and the accompanying holiday, the Kalaram Temple and Sita Cave witnessed a rush of devotees and tourists for darshan on Monday.
New Year 2024: संकल्पांची पेरणी करत नववर्षाचे स्वागत! हॉटेल्समध्ये तोबा गर्दी; गच्चीवर एकत्र येत पार्टीला पसंती

दरम्यान, गोदाघाटावरील सांडव्यावरील देवी मंदिरासमोर तसेच रामतीर्थाजवळ सकाळपासून वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली. येथील रिक्षाथांबा, त्यातच मोठ्या प्रमाणावर उभ्या केलेल्या दुचाकी, व्यावसायिकांचे अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजली गेली असल्यासारखे वातावरण असते.

विशेष म्हणजे काही काळापूर्वी रामतीर्थावरील पोलिस चौकीतून वाहतुकीबाबत सूचना दिली जात होती. परंतु चौकीचे नूतनीकरण करण्यात आल्यापासून ती बंदच असल्याचा अनुभव आहे. या ठिकाणी मालेगाव स्टँड, कपालेश्‍वर मंदिराची मागील बाजू, साईबाबा मंदिर, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, गोरेराम मंदिर आदी भागातून रस्ते एकत्र येतात.

त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सांडव्यावरील देवी मंदिरासमोरही सरदार चौक, रामतीर्थ, शनी गल्ली, गागडे महाराज पूल आदी भागातून वाहने मोठ्या संख्येने येत असल्याने येथेही वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

Due to the welcome of New Year and the accompanying holiday, the Kalaram Temple and Sita Cave witnessed a rush of devotees and tourists for darshan on Monday.
New Year 2024: फ्लाईंग किस अन्... थलायवानं केलं चाहत्यांचं न्यू इयर हॅप्पी! रजनीकांतचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.