NMC To PWD : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलासाठी टाळाटाळ; महापालिकेकडून सचिवांना स्मरणपत्र

PWD latest marathi news
PWD latest marathi newsesakal
Updated on

Nashik News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची हॉटेलजवळ झालेल्या अपघातानंतर या भागात उड्डाणपूल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलेही कारवाई होत नसल्याने महापालिकेला अखेरीस स्मरणपत्र पाठविण्याची वेळ आली आहे. (Reminder from Municipal Corporation to Secretary about flyover by pwd nashik news)

महापालिका आयुक्तांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये पंचवटी विभागातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात पहाटे बसचा मोठा अपघात झाला. अपघातानंतर बसला आग लागून यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉट शोधण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, शहर पोलिस वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाशिक महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले.

त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर नाका (पूर्वीचा औरंगाबाद नाका) नांदूर नाका या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची शिफारस रेझिलिएंट इंडिया या सल्लागार संस्थेने केली. वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याच धर्तीवर हा पूल उभारावा, अशी सूचना कंपनीकडून करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

PWD latest marathi news
Unseasonal Rain Damage : हंगामात शेणखताची मागणी घटली; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान

सदर रस्ता हा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या बांधकाम विभागाने उड्डाणपूल उभारण्याची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती महापालिकेने राज्य शासनाकडे केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील सरकारकडे प्रस्ताव पाठविला व राज्य मंत्रिमंडळात त्याला मान्यतादेखील मिळाली.

परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. पूल उभारण्यासंदर्भात कागद हलत नसल्याने अखेरीस महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांना स्मरणपत्र पाठवून उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती केली आहे.

पावसाळ्यापूर्वी ब्लॅक स्पॉट दुरुस्ती

रेझिलिएंट इंडिया या सल्लागार संस्थेने शहरातील अपघात ग्रस्त ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण केले. यात शहरात २६ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळून आले. २६ अपघाताचे ब्लॅक स्पॉट निश्चित करताना तेथील वाहतुकीची कोंडी, अपघाताचे प्रमाण याची आकडेवारीदेखील सादर करण्यात आली.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम निविदा काढली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी अपघातांचे ब्लॅक स्पॉट दुरुस्त केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

PWD latest marathi news
Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.