Nashik News : शहरातील भुयारी गटारीची निविदा उघडण्यास होणार विलंब संशयास्पद आहे. आगामी काळात शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, पक्ष एकत्रित करून सर्वपक्षीय मिळून ‘आयुक्त हटाव, मालेगाव शहर बचाव’ ही मोहीम राबविणार आहे.
महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे ६०० कोटीचे आहे. पूर्व भागात कामे देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते फैजुल्लाह अन्सारी यांनी येथे केला. येथील मुशावरत चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Remove commissioner save city slogan Attack of MIM office bearers in Malegaon Discrimination in eastern areas also regarding jobs Nashik)
एमआयएमने आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टिका केली. ‘मालेगाव शहरात आयुक्त कामे करताना भेदभाव कऱतात. गेल्या तीन वर्षापासून आयुक्त ठरावीक तीन ठेकेदारांनाच काम देत आहे.
दुसऱ्या ठेकेदारांना काम का दिले जात नाही.? प्रभाग एकमध्ये जादा कामे मंजूर केली आहेत. या भागात कामाचा दर्जा चांगला असतो. शहरात गेल्या दोन महिन्यापासून भुयारी गटारीची निविदा भरण्यात आली.
अद्यापही निविदा उघडली नाही. दहा दिवसापूर्वी निविदा उघडावी यासाठी आयुक्तांना आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिले आहे.
येत्या आठवड्यात निविदा न उघडल्यास, कामातील दुजाभाव दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. माजी नगरसेवक गिरीश बोरसे, अन्सारी मोहम्मद हुसैन, अतर हुसैन अश्रफी, सलमान अन्सारी, साजीद अन्सारी, शहबाज अन्सारी आदी उपस्थित होते.
याआधीही झाली टीका
यापूर्वी माजी आमदार रशीद शेख, आसिफ शेख या पिता-पुत्रांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यावर कठोर शब्दात टिका केली होती.
कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पाठोपाठ एमआयएमनेही आयुक्तांना टिकेचे लक्ष्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.