नाशिक : गोठे, तबेल्यांचे परवाना नूतनीकरण बंधनकारक

Cowshed
Cowshedesakal
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीतील गोठे व तबेले धारकांना २०२२-२३ वर्षासाठी परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढण्यासाठी १ ते ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिका (NMC) क्षेत्रातील गोठे (cowshed) धारकांनी परवाना नूतनीकरण व विनापरवाना गोठे धारकांनी नवीन परवाने काढण्याचे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी केले.

Cowshed
महापालिका प्रशासक काळात अधिकाऱ्यांच्या मुजोरीला नाशिककर त्रस्त

महापालिका क्षेत्रातील नाशिक शहर परिसरासह गंगापूर, आनंदवली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी, वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागांचा समावेश आहे. तसेच विनापरवाना अथवा विना अनुज्ञप्ती (License) गुरे बाळगणाऱ्यांना २ हजार रुपयांपर्यंत दंड व ३ वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. शासनाच्या अधिसूचनेद्वारे महापालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ या कायद्यानुसार विनापरवाना गुरे पाळणे, गुरांची ने आण करणे गुन्हा असल्याने, महापालिका क्षेत्रातील गोठे, तबेले धारकांनी ३० एप्रिलपर्यंत परवाना नूतनीकरण न केल्यास प्रती जनावर पाच रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे.

Cowshed
'खड्ड्यांचे गाव' म्हणून राज्यात 'या' गावाची नवी ओळख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.