NMC Latest News
NMC Latest Newsesakal

NMC : शालाबाह्य मुलांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण; विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेची बाब

Published on

नाशिक : कोरोनामुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेकडून पुन्हा शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वेक्षण होईल. यासंदर्भात महापालिकेच्या शाळांमध्ये केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी मुख्य सेविकांना प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी सूचना दिल्या आहेत. (renewed survey of out of school children Declining number of students matter of concern Nashik Latest Marathi News)

मागील दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. याचा सर्वाधिक फटका महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बसला. या वर्षी शाळा नियमित सुरू झाल्या असल्या, तरी अनेक पालकांकडून विद्यार्थ्यांना नियमित शाळेत टाकले गेले नाही. महापालिकेच्या शिक्षकांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यानंतरही काही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेले.

तर, काही मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महापालिकेने सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार स्थलांतरित मुलांना शिक्षणासंदर्भातील हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात काही पालक नियमित स्थलांतर होत असतात.

अशा पालकांच्या घरी जाऊन वय वर्ष ३ ते १८ वयोगटातील बालकांना शोधून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष करून दगडखाणी, वीटभट्ट्या, साखर कारखाने, शेतमजूर, औद्योगिक वसाहती तसेच असंघटित मजूर ज्या भागात आहे, तेथे सर्वेक्षण केले जाणार आहे. स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देऊन ते ज्या भागात वास्तव्याला आहे, तेथेच १०० टक्के प्रवेश देण्याचे नियोजन केले जात आहे.

NMC Latest News
Nashik NMC : पुढील वर्षी पुन्हा उडणार पदोन्नतीचा बार; अधिकाऱ्यांची समिती गठित

त्याचप्रमाणे शाळांमधील अशा मुलांची उपस्थिती टिकून राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व उपस्थिती भत्ता दिला जाणार आहे. लेखन साहित्यासाठीदेखील स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाणार आहे. या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात ४९ शालाबाह्य मुले आढळून आली होती.

"स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी प्रोत्साहन भत्तादेखील दिला जाणार आहे."

- सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, महापालिका, शिक्षण विभाग.

NMC Latest News
SAKAL Exclusive : शहरात अनधिकृत मोबाईल टॉवरचा सुळसुळाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()