SAKAL Exclusive: किती गुरुजींनी फोटो वर्गात लावले याचा मागवला अहवाल! वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता

Government of Maharashtra
Government of Maharashtraesakal
Updated on

इगतपुरी : राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आपले गुरुजी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांनी आपले फोटो वर्गाच्या दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. सुमारे वर्षभरानंतर आता किती गुरुजींनी आपले फोटो वर्गात लावले आहेत, याचा प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल शिक्षण विभागाने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

यासंदर्भात शिक्षण विभागाला पुढील काही दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे शासन आणि शिक्षक यांच्यात पूर्वी झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (report has been requested on how many teachers put photos in classroom possibility of reemergence of controversy at igatpuri Nashik News)

शाळेत तोतया शिक्षक ठेवणे, स्वतः शाळेत न येणे, असे काही प्रकार शाळांमध्ये उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक शाळेत शिक्षकाने स्वतःचा फोटो लावावा, अशा सूचना दिल्या होत्या.

मात्र, शिक्षक संघटनेने या निर्णयाचा विरोध केला होता. शिक्षक शाळेत फोटो लावणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. वर्षभरापासून त्यावर पडदा पडला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने ‘शिक्षकांचा वर्गातील फोटो’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, पुण्यातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, सर्व शाळांकडून फोटोविषयक माहिती मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विधिमंडळात ‘आपले गुरुजी’ उपक्रमासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्रक काढले आहे.

Government of Maharashtra
Christmas Festival 2023: ख्रिस्ती बांधव विश्वशांतीसाठी करणार प्रार्थना; नाशिकमध्ये नाताळची तयारी सुरू

त्यात जिल्ह्याचे नाव, एकूण शाळांची संख्या, शिक्षकांचे फोटो वर्गात लावलेल्या शाळांची संख्या, एकूण शिक्षक संख्या आदी माहिती मागविली आहे.

"विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे शिक्षण विभागाने ही माहिती मागविली आहे. मात्र, शिक्षक रोज वर्गात बसतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्यांना आपल्या प्रत्येक शिक्षकांची माहिती आणि ओळख असते. त्यामुळे एकाही वर्गात शिक्षक फोटो लावणार नाही, ही आमची भूमिका पूर्वीही होती आणि आजही आहे. राज्यात एकाही वर्गात शिक्षकाचा फोटो लावलेला दिसणार नाही."

-विजय कोंबे, राज्याध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती

"शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक शिक्षकांना ओळखतात. नियमित शाळा भेट करणारे केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा शिक्षकांना ओळखते. मग शाळेत शिक्षकांचे फोटो कशासाठी लावायचे? शाळेच्या भिंतीवर शिक्षकाचा फोटो लावणे, हा शिक्षकांवर दाखवलेल्या अविश्वास आहे. ही बाब अपमानास्पद आहे. हा निर्णय मागे घेतला जावा."-निवृत्ती नाठे, नाशिक जिल्हा सरचिटणीस, राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Government of Maharashtra
Nashik News: आदिमाया सप्तशृंगीच्या धनुर्मास उत्सव सुरू; 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.