Nashik News : सातपूरमधील गुंडागर्दीविरोधात आयुक्तांना साकडे

commissioner against gangsterism in Satpur
commissioner against gangsterism in Satpuresakal
Updated on

Nashik News : सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजरोसपणे गुंडागर्दी केली जात असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांच्याकडून दहशत माजविली जात आहे.

पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने काही नागरिकांनी थेट पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत सातपूर परिसरातील गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यासाठी साकडे घातले आहे. (Request to Commissioner to fight against gangsterism in Satpur Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सातपूर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. रोलेट जुगार, ऑनलाइन गेम, गांजा यासारखी अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. काही राजकीय पदाधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत.

काहींनी परिसरात अतिक्रमण केले असून, त्यांना राजकीय पाठबळ दिले जात आहे. तक्रार करणाऱ्यांना दमदाटी केली जाते. शिवाजीनगर, श्रमिकनगर परिसरामध्ये टवाळखोरांकडून उपद्रव माजविला जातो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टवाळखोरांविरोधात कारवाई व्हावी.

या टवाळखोरांना संरक्षण देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाई करण्यासंदर्भात आश्‍वासन दिले. माजी महिला बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर, सविता गायकर, माजी सभापती सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, श्रीराम मंडळ, मंगला खोटरे आदींनी निवेदन दिले.

commissioner against gangsterism in Satpur
Nashik News : साठवण तलाव भरूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा; पाऊस लांबल्याचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.