नाशिक : जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी (Panchayat Samiti election) अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षणाची सोडत (Reservation draw) गुरुवारी (ता. २८) सकाळी अकराला काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढली जाईल. पंचायत समित्यांसाठीची सोडत त्याचदिवशी आणि त्याचवेळेला तालुकास्तरावर काढली जाईल. (reservation draw for ZP Election at Collector office on Thursday nashik Latest Marathi News)
उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची सूचना प्रसिद्धीला दिली आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतील रहिवाशांना आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहता येईल, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
आरक्षणाचे प्रारूप शुक्रवारी (ता. २९) प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती अथवा सूचना असल्यास जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांकडे २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर करता येतील.
पंचायत समित्यांसाठी काढण्यात येणाऱ्या आरक्षणाचे स्थळ असे : नाशिक-तहसीलदार कार्यालय, दिंडोरी-पंचायत समिती सभागृह, त्र्यंबकेश्वर-तहसीलदार कार्यालयातील बैठक सभागृह, इगतपुरी-पंचायत समिती सभागृह, चांदवड-मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, कळवण-मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील पंचायत समिती सभागृह, नांदगाव-तहसीलदार कार्यालय, येवला-तहसीलदार कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृह, बागलाण-पंचायत समिती सभागृह, देवळा-नवीन प्रशासकीय इमारतीमधील तहसीलदार कार्यालय, पेठ-तहसीलदार कार्यालय नवीन इमारत, सुरगाणा-पंचायत समिती सभागृह, मालेगाव-तहसीलदार कार्यालयातील बैठक सभागृह, निफाड-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारातील सभागृह, सिन्नर-तहसीलदार कार्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.