नाशिक रोड : नोकरदार महिलांना पंचवटी एक्स्प्रेसला मनमाड ते मुंबई जाताना (अप) आरक्षित डबा होता. मात्र, मुंबई ते मनमाड डाऊन लाईनला आरक्षित डबा नसल्याने अनेक वेळा येताना महिलांची हाल होत.
या सर्व गोष्टींचा विचार करून प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार रेल्वे बोर्डाने मुंबई ते मनमाड महिलांना आरक्षित डबा मंजूर केला असून, मुंबईहून मनमाडकडे येताना १९ वा डबा महिलांना आरक्षित असणार आहे. (reserved coach for women in Mumbai Manmad journey Panchavati Express Chakarmani atmosphere of joy among women nashik news)
मनमाड ते मुंबई रोज किमान हजार प्रवासी प्रवास करत आहेत. यात महिलांची संख्या किमान २०० ते २५० आहे.
बँकिंग, रेल्वे, कस्टमर, हायकोर्ट, मंत्रालय, शाळा, महाविद्यालय, इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी नोकरी करणारे अनेक नाशिककर एका दिवसात जिवाची मुंबई करून नाशिकला आपल्या घरी विसावा घ्यायला येतात.
अनेक वेळा जाताना येताना महिलांना गर्दीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा जागा मिळत नाही. प्रवासी संघटनेने महिलांसाठी मुंबई ते मनमाड पंचवटीला आरक्षित डबा मिळावा, अशी मागणी केली होती.
या मागणीचा विचार करून रेल्वे बोर्डाने महिलांसाठी मुंबईहून नाशिककडे येताना पंचवटीला महिलांना डबा आरक्षित केला आहे. येताना १९ वा डबा महिलांसाठी आरक्षित असणार आहे, तर मनमाडवरून मुंबईकडे जाताना चौथा डबा महिलांसाठी आरक्षित आहे.
यामुळे प्रवासी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असून, काम करून येताना किमान आरामदायी प्रवास होणार असल्याची प्रतिक्रिया महिलांनी नोंदवली आहे.
"महिलांना मुंबईवरून येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत. अनेक वेळा जागा मिळत नसे, तर अनेक वेळा उभ्याने प्रवास करावा लागत. या सर्व गोष्टींवर विचार करून रेल्वेने घेतलेला निर्णय महिलांकडून स्वागत करणारा असून यामुळे महिलांना नक्कीच आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळेल."- ॲड. राणी रंधे- तळेकर, प्रवासी
"महिलांसाठी आरक्षित डबा असावा अशी मागणी आम्ही केली होती. रेल्वे बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देऊन ही मागणी मान्य केली आहे. महिलांना मुंबईहून नाशिकला येताना निर्माण होणाऱ्या समस्या दूर होणार आहे. शिवाय आरामदायी प्रवास मिळणार आहे. रेल्वे बोर्डाचे धन्यवाद मानतो."- राजेश फोकने, पदाधिकारी, प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.