SAKAL Exclusive : गावठाण रहिवासी तीव्र धोक्याच्या पातळीत! अग्निशमनाच्या वाहनांना ‘बॅकअप’ गरजेचा

Sakal Exclusive
Sakal Exclusiveesakal
Updated on

नाशिक : गावठाण भागातील नव्वद रस्त्यांची रुंदी तीन ते चार मीटर असल्याने या भागात आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमनाच्या वाहनांना घटनास्थळी पोचणे अशक्य आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे हे भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असून, आग लागण्याची घटना घडल्यास वित्त व जीवितहानी होण्याच्या शक्यता अधिक वाढतात.

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. लोकसंख्या व सर्व प्रकारची वाहने मर्यादित होती. त्यामुळे समस्या जाणवत नव्हती. परंतु, लोकसंख्येबरोबरच वाढती वाहने ही समस्या अधिक तीव्र होत असल्याने दिवसागणिक गावठाणातील नागरिक धोक्याच्या तीव्र पातळीत येताना दिसत आहे. (Residents of Gavthan in acute danger level Firefighting vehicles need backup SAKAL Exclusive nashik news)

आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी विनाअडथळा पोचण्यासाठी शासनाने नऊ मीटर रुंदीपुढील रस्त्यांवरच बहुमजली इमारत बांधण्यास परवानगी देण्याचे धोरण आखले आहे. परंतु गावठाण भागात तीन ते चार मीटर रुंदीचे रस्ते, तसेच त्या रस्त्यांवर दुचाकी, रिक्षांसह चारचाकी वाहनांचा गराडा पडल्याने वाहने सोडाच पायी प्रवास करणे अशक्य आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ टेक भागात सिलिंडर गॅसच्या स्फोटामुळे आग लागण्याची घटना घडली. त्यात चार घरे भस्मसात झाली. वित्तहानी होण्यामागे अरुंद रस्ता व अरुंद रस्त्यातील अडथळे कारणीभूत ठरले.

घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर अग्निशमन विभागाचे छोटे वाहन उभे करण्यात आले. छोट्या वाहनांमध्ये मोठ्या अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने पाणी टाकले गेले. गावठाणातील अरुंद रस्त्यांमुळे अशा प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण होते.

‘हायड्रंट’चा पर्याय

अरुंद रस्ते व दाटीवाटीने उभे असलेले वाडे व घरे असली तरी जलवाहिन्या पोचल्या आहेत. मुख्य जलवाहिनीवरच महत्त्वाच्या ठिकाणी हायड्रंट पॉइंट काढण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने स्मार्टसिटी कंपनीला दिला आहे.

जवळपास ४५ हायड्रंट पॉइंट काढावे, जेणेकरून अग्निशमन विभागाचे बंब पोचले नाही तरी हायड्रंटच्या माध्यमातून घटनास्थळी पाण्याचे फवारे मारणे शक्य होणार आहे. परंतु, स्मार्टसिटी कंपनीमार्फत काँक्रिटचे रस्ते तयार करण्यास प्राधान्य दिले. परंतु, आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी हायड्रंट पॉइंटच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Sakal Exclusive
Bhairavnath Yatrotsava : भैरवनाथ यात्रोत्सवाचा सिन्नरमध्ये उत्साह; मिरवणुकीत अबालवृद्धांचा सहभाग

गावठाणातील रस्त्यांची स्थिती

- एकूण रस्ते- १७१

- चार-पाच मीटर रुंदीचे रस्ते- ९०

- उर्वरित रस्ते- ८१.

येथे अग्निशमन बंब पोचणे अशक्य

घनकर लेन, वावरे लेन, व्हीडिओ गल्ली, टाकसाळ लेन, साळी वाडा, मुलतानपुरा- जोगवाडा, फावडे लेन, काझी गढी, मिरजकर लेन, संभाजी चौक पुतळा दोन्ही बाजू, काझी गढी, मधली होळी, लोणार गल्ली, भद्रकाली फ्रूट मार्केट, पाटील गल्ली, सोमवार पेठ, खैरे गल्लीमधील बाजू, शुक्ल गल्ली, छपरी तालीम मागील बाजू, नामदेव पथ, दंडे हनुमान गल्ली, म्हसरूळ टेक, नानावली, दिल्ली दरवाजा, चित्रघंटा, दत्त कोट, डिंगरआळी परिसर.

"गावठाण भागात आगीची घटना घडल्यास अरुंद गल्ली हे एक महत्त्वाचे कारण आहे. छोट्या वाहनांना मोठ्या वाहनांचा बॅकअप द्यावा लागतो. यात अधिक वेळ लागतो. त्यावर पर्याय म्हणून स्मार्टसिटी कंपनीकडे हायड्रंटचा प्रस्ताव दिला आहे."

- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

"जुन्या काळापासून गावठाण भाग वसला आहे. त्यामुळे पर्याय नाही. महापालिकेने हायड्रंट पॉइंट काढण्याचे सुचविले परंतु तात्पुरते विषय चर्चेला जातो. पुढे जोपर्यंत घटना घडतं नाही तोपर्यंत या विषयावर चर्चा होत नाही. गावठाणातील वाढत्या समस्या लक्षात घेता सोय करणे आवश्‍यक आहे." - शाहु खैरे, माजी काँग्रेस गटनेते.

"लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढतं आहे. यावर नियंत्रण आणणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेने पार्किंग साठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. समस्या दिवसेंदिवस वाढतं जाणार आहे." - मनोज घोडके, सामाजिक कार्यकर्ते.

"गावठाणात समस्या वाढतं आहे व पुढेही वाढतील. त्यावर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पार्किंगच्या समस्येवर अनेक वर्षांपासून तोडगा निघत नाही. रविवार कारंजा येथे बहुमजली पार्किंगचा विषय अडकवून ठेवला आहे." - रश्मी भोसले, (स्व.) सुरेखा भोसले प्रतिष्ठान.

Sakal Exclusive
MUHS Election Results : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थगित निवडणूकीचा निकाल जाहिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()