Nashik Quazi Gadhi : रायगड जिल्ह्यातील इरसाळवाडी गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काजी गढीची पाहणी करून स्थानिक नागरिकांना समाजमंदिरात स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या.
पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. (Residents of Quazi Gadhi advised to evacuate to safe place nashik news)
गेल्या अनेक वर्षांपासून काजी गढी येथे धोकादायक घरे आहे. गडीला संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भातील विषयदेखील अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे पावसाळा आला की गडी व संरक्षक भिंतीचा विषय चर्चेला येतो.
दरवर्षी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून नोटीस देऊन सोपस्कार पार पाडला जातो. या वर्षीदेखील जवळपास गढी येथील शंभरहून अधिक घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या इरसाळवाडी येथे गुरुवारी (ता. २०) सकाळी जमीन खचण्याची दुर्घटना घडली. यात आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले, तर बाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांना तातडीने सूचना देऊन नाशिक शहरातील काझी गढी या धोकादायक भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने पश्चिम विभागाचे अतिक्रमण विभागाचे निरीक्षक विनय जाधव व अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रवीण बागूल यांनी धोकादायक भागाची पाहणी केली. धोकादायक गढी असल्याने सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. या वेळी स्थानिक नागरिकांच्या रोषालादेखील सामोरे जावे लागले.
"निवडणुका आल्या की मत मागण्यासाठी येतात. इतर वेळेस आम्ही जिवंत आहे की मेलो ढुंकूनही बघत नाही. हलाखीची परिस्थिती असल्याने जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. अन्य ठिकाणी घर भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे शक्य नाही. सरकारने या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी."- ताराबाई खैरनार, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.