Anjaneri Ropeway : अंजनेरी ते ब्रम्हगिरी दरम्यान रोपवे करण्याच्या प्रस्तावाला विरोध वाढतच आहे. केंद्र शासनाचा पुरस्कार परत करण्यासह मेटघर ग्रामपंचायतीने या प्रस्तावाविरोधात आज ग्रामसभेचा ठराव करीत पर्यावरणप्रेमीच्या आंदोलनाचे बळ वाढविले. (Resolution against proposal of Metghar Gram Panchayat to build ropeway from Anjaneri to Brahmagiri nashik news)
जटायूंचा अधिवास, अंजनेरीची जैवविविधता, ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी प्रस्तावित अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवेला नाशिक त्र्यंबकेश्वरमधील सर्व पर्यावरण संस्थांचा विरोध सुरू आहे. त्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी वनमंत्र्यांची भेट घेतली. वनमंत्र्यांनी हा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात टोलवित अहवाल मागविला आहे. त्यानंतरही पर्यावरणप्रेमीचा विरोध वाढतच आहे.
ब्रह्मगिरी मेटघर ग्रामस्थांनी रोपवे विरोधात ठराव करून विरोध दर्शविला आहे. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने गतवर्षी ९ आॅगस्ट २०२२ ला ठराव करीत विरोध केला आहे. राजू खोडे या ग्रामस्थांनी मांडलेल्या ठरावाच्या मान्यतेचे पत्र देण्यात आले. गडदुर्ग संवर्धनात काम करणाऱ्या शासन नियुक्त समित्यांनीही ठराव विरोध दर्शविला आहे. पर्यावरण प्रेमींनी जटायू गिधाड पक्षाचे महत्त्व सांगणारे उपक्रम सुरु केला आहे.
पुरस्कार परतीचा इशारा
खोरीपाडा येथील जैवविविधता व गिधाड संवर्धनासाठी प्रसिद्ध पुरस्कारप्राप्त शंकर बाबा शिंदे यांनी ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन करताना आयुर्वेदिक दुर्मिळ औषधी वनस्पती संवर्धनासाठी, जटायू पक्षांच्या सेवेसाठी शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला जात असताना त्यांनाच रोपवेरुपी विकासाने उध्वस्त केले जात असेल तर अशा पुरस्कारांची गरज काय? असे पुरस्कार परत करणेच योग्य ठरेल असा इशारा देत, हा प्रकल्प इतरत्र सुरू करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वन्यजीव अभ्यासक जयेश पाटील यांनी अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व सांगून रायगड येथील रोपवे हा गिधाड नष्ट करणारे उत्तम उदाहरण ठरत असताना अंजनेरी ब्रह्मगिरी येथील रोपवेबाबत सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी केली.
अनावश्यक रोपवे ऐवजी येथील निसर्ग संपदेच्या रक्षणासाठी १०० कोटी रुपये सरकारने पर्यावरण विकासासाठी द्यावेत. बदलते हवामान लक्षात येथील बोडक्या डोंगराचे जैवविविधतेने संपन्न भारतीय वृक्षराजीने हरितकरणासाठी द्यावेत अशा भावना पर्यावरणप्रेमीनी मांडल्या.
आधी गोदावरी, आता जटायूस्थान
उगमस्थानी त्र्यंबकेश्वरला गोदावरी गटारात घातली आता, जटायूंचे आद्य स्थान धोक्यात घालून काय विकास साधणार? गोदावरी आणि जटायूस्थानाच्या विकासातून अंजेरीचा विकासच खरा शाश्वत विकास ठरेल अशी भावना सोमा कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शंकरबाबा शिंदे, पर्यावरण प्रेमी, कवी देवचंद महाले, डॉ. संदीप भानोसे, अरविंद निकुंभ, नीलाय बाबू शहा, रमेश अय्यर, मनीष बाविस्कर, तुषार पिंगळे, जयेश पाटील, मानव उत्थान मंचचे जगबिर सिंग, तुषार गायकवाड, गणेश चव्हाण, हेमंत कोलते, आदित्य केदारे, दीपक महाजन, ऋषिकेश तिवडे, दत्ता देशमाने, संकेत शेलार, विशाल बाफना, सोमा कुऱ्हाडे, शरयू कामत, वैशाली कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.