Nashik News : नागरिकांच्या तक्रारी सोडवा, अन्यथा कारवाई; आयुक्तांची विभागीय अधिकाऱ्यांना तंबी

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : ज्या तक्रारी विभागीय पातळीवर सोडविणे शक्य असताना, त्या तक्रारी सोडल्या जात नाही. परिणामी तक्रारदार नागरिक थेट आयुक्तांची भेट घेतात. यामुळे आयुक्तांचे कामकाज तर वाढतेच दुसरीकडे विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमतादेखील स्पष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहा विभागीय अधिकाऱ्यांना आयुक्तांनी नोटिशीच्या माध्यमातून तंबी दिली आहे. नागरिकांची कामे तातडीने सोडवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Resolve citizen complaints otherwise action Commissioner notice to departmental officers Nashik Latest Marathi News)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जुलै महिन्यात रुजू झाले. आयुक्त नवीन असल्याने त्यांच्याकडे समस्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढली. तातडीने कामे सोडविली जातात व तक्रारींचा निपटारादेखील वेगाने होत असल्याने आयुक्तांना भेटणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. विभागप्रमुखांच्या बैठका तसेच महत्त्वाच्या बैठका सोबतच तक्रार घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

विशेष म्हणजे निवडणुका नसल्याने सर्वसामान्यांना आयुक्त हेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सोईस्कर वाटतात. सर्वांनाच वेळ देणे शक्य नसते. तक्रारींच्या अर्जावर किंवा कामाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जावर विभागप्रमुखांना सूचना देऊन समस्येचे निराकरण केले जाते. मात्र, समस्यांचे निराकरण करत असताना आयुक्तांच्या काही बाबी लक्षात आल्या, त्या म्हणजे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर विभागीय पातळीवर तोडगा निघणे शक्य असते.

ते अर्जदेखील आयुक्तांकडे नागरिक घेऊन येत आहे. त्यातून खालच्या अर्थात विभागीय स्तरावर कामे होत नाही किंवा अकार्यक्षमता प्रकट केली जात आहे. त्यामुळे जी कामे विभागीय स्तरावर शक्य आहे, त्या कामांचा निपटारा किंवा तक्रारी विभागीय स्तरावरच सोडविल्या जाणे आयुक्तांना अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने सहा विभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कामे किंवा तक्रारी जलदगतीने सोडविण्याच्या सूचना देताना मुख्यालयात तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाल्यास त्याची शहानिशा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
Garbage in city : शहरातील कचऱ्यात 10 टक्के वाढ!; रात्रीची 20 ठिकाणी घंटागाडी सुरू

थांबता थांबेना लाचेची प्रकरणे

सिडको विभागीय कार्यालयात बच्छाव नामक एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आले आहे. दोन महिन्यापूर्वी लाचलुचपत विभागाची रेड फसली. त्यापूर्वी नाशिक रोड विभागीय कार्यालयात हजेरी लावण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले होते.

त्याअनुषंगाने आयुक्ताने महापालिका मुख्यालयात बैठक घेत हालचाल वहीमध्ये नोंद करण्याच्या सूचना देताना कामात शिस्त आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही बेशिस्तीचे प्रकरणे समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले जाणार आहे.

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news
Rajya Natya Spardha : उपरोधिक मर्मभेदक विनोद ‘शीतयुद्ध सदानंद’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()