NDA Admission : सेंट मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला करिअर अकादमीतर्फे इयत्ता अकरावीच्या एनडीए प्रवेश परीक्षा सराव तुकडीसह विज्ञान शाखा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया राबविली.
भोसला मिलिटरी स्कूल आणि गर्ल्स हायस्कूलमध्ये रविवारी (ता.१६) झालेल्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या रविवारी (ता.२३) विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Response to NDA Admission Process in Bhosla Campus Another chance next Sunday nashik news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
रविवारी झालेल्या प्रवेश प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी या प्रक्रियेसाठी हजर झाले होते. या प्रवेश प्रक्रियेत वैकल्पिक आणि वर्णनात्मक स्वरूपाची प्रश्नावली संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दिली होती.
प्रश्नावलीत इंग्रजी, विज्ञान, गणित, सामान्यज्ञानासह आदी विषयांचा समावेश केला होता. शारीरिक कार्यक्षमता चाचणी व वैद्यकीय चाचणी पार पडली. येत्या रविवारी (ता. २३) होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी bhonsala.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेचे सर कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद नरवणे, शाळेचे पालक मिलिंद वैद्य, शीतल देशपांडे, संस्था शिक्षणाधिकारी एस. डी. कुलकर्णी, अनिरुद्ध तेलंग, शाळेच्या समादेशक सपना शर्मा, मुख्याध्यापक राजेंद्र जगताप, शर्मिला भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.