Nashik : शिवभोजन थाळीला प्रतिसाद कायम

shivbhojan thali latest marathi news
shivbhojan thali latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : शिवसेनेतील बंडखोर गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्वाखालील सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारचे निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे.

मात्र यात कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेला शिवभोजन थाळीचा निर्णय मात्र अजूनपर्यंत तरी कायम आहे. त्यामुळे प्रतिसाद असलेल्या या योजनेचा आजही दररोज दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. (Response to Shiv Bhojan Thali continues Nashik Latest marathi news)

महाविकास आघाडी सरकारने ही योजना सुरू केली होती. सुरवातीला दहा रुपये व कोरोनाकाळात पाच रुपयांत मिळणाऱ्या या योजनेला राज्यभर

shivbhojan thali latest marathi news
Anti Motorcycle Theft पथक ॲक्शन मोडमध्ये; 3 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेल्या या शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्थानक आणि बाजार समित्यांसह महत्त्वाच्या व मोक्याच्या जागांवर हा उपक्रम राबविला जातो.

सत्तांतरानंतर निर्णय बदलाच्या या धुमधडाक्यात शिवभोजन थाळीचा निर्णय बदलला जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. अशातच काही दिवस या योजनेचे अनुदान रखडल्यानेही चर्चा वाढली होती. मात्र, ही योजना तशीच सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत.

८९ केंद्रांवर प्रतिसाद

जिल्ह्यासाठी ९२ केंद्रे असून, त्यांपैकी ८९ केंद्रे सुरू आहेत. साधारण १२ हजार ५०९ इतकी थाळ्यांची संख्या मंजूर आहे. गुरुवारी (ता. ४) दहा हजार ८७ थाळ्यांचा नागरिकांनी लाभ घेतला.

shivbhojan thali latest marathi news
Rain Update : तासाभराच्या पावसात रस्ते पाण्याखाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()