Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी येवला बंदला प्रतिसाद! आजपासून तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Shops closed on Mondays in the city.
Shops closed on Mondays in the city.esakal
Updated on

Maratha Reservation Protest : उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांना दिलेले आश्वासन पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कुणबीचे दाखले देण्याचा निर्णय घ्यावा, यांसह विविध मागण्यासाठी रविवारी (ता. १७) दुपारपर्यंत येथे सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान, सोमवार (ता. १८)यापासून येथील तहसील कार्यालयात रोज ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील समन्वयक संजय सोमासे यांनी दिला आहे. (Response to yeola Bandh for Maratha reservation Protest at Tehsil Office from today nashik)

येथील सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसांपूर्वीच रविवारी येवला शहर व तालुका बंद पुकारला होता. पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत हरतालिका व गणेशोत्सवामुळे संपूर्ण दिवस बंद पाळण्यात येऊ नये, अशी विनंती व्यापारी संघाने केली होती. त्यानुसार रविवारी दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली.

रविवारी सकाळी सकल मराठा समाजबांधवांनी विंचूर चौफुली येथे एकत्र येत ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.

जरांगे यांच्या आंदोलनावर ४० दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले असून, आश्वासनाची पूर्ती होईपर्यंत सोमवारपासून तहसील कार्यालयात रोज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

शासनाने समाजाच्या भावनांशी न खेळता तत्काळ आरक्षणाचा निर्णय घेऊन गरजू व गोरगरिबांना न्याय द्यावा, असे आवाहन या वेळी संजय सोमासे व चंद्रमोहन मोरे यांनी केले.

युवराज पाटोळे, निंबा फरताळे, विजय मोरे, गोरख संत, गोरख कोटमे, आदित्य नाईक, गणेश सोमासे, सागर नाईकवाडे, नितीन गायकवाड, संजय पवार, रमेश बोराळे, राहुल जाधव, सचिन पिंगळे, गणेश वारुळे, सुनील मढवई, माणिक पवार, ऋषी काळे, प्रफुल्ल गायकवाड, जालिंदर मेंढेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shops closed on Mondays in the city.
Nandurbar Flood News: तापीला महापूर, पुलाला भगदाड! टाकरखेडाकडील भरावही वाहून गेला; वाहतूकही थांबविली

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पूर्ण करावे, राजापूर येथील राजे शिवछत्रपती शिवरायांचा बंदिस्त असलेला पुतळा मानासन्मानाने पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित करावा, महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी घोषित करावे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजावर गुन्हे दाखल केले आहेत, त्याचे चार्जशीट दाखल करू नये,

शहरात २००५ पासून मागणी केलेली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसृष्टीचे काम १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, १९७२ पासून ते आजपर्यंत पूर्ण न झालेल्या येवला तालुक्यातील पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याचे काम २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करावे,

चिचोंडी येथे होऊ घातलेल्या एमआयडीसीच्या राहिलेल्या पायाभूत सुविधांचे काम त्वरित पूर्ण करून नवीन कंपन्या त्वरित आणाव्यात, येवला औद्योगिक वसाहतीला अधिक जमीन संपादन करून द्यावी, पालखेड डावा कालवा बारमाही पाण्यास मंजुरी द्यावी व कमीत कमी शेतीसाठी ५ ते ६ आवर्तने चारी क्रमांक ५२ पर्यंत आरक्षित करावे व त्याची अंमलबजावणी करावी,

अंगणगाव येथील पैठणी पर्यटन केंद्राजवळील बंद असलेले पैठणी क्लस्टर त्वरित सुरू करावे आदी मागण्यांची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करून सोमवारपासून तहसील कार्यालयात रोज ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Shops closed on Mondays in the city.
Recruitment: दिंडोरी तालुक्यात होणार पोलिसपाटील भरती! 21 सप्टेंबरला तहसील कार्यालयात आरक्षण सोडत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.