नाशिकमध्ये संसर्ग दर घटूनही निर्बंध ‘जैसे थे’

nashik crowd
nashik crowdesakal
Updated on

नाशिक : नाशिकच्या कोरोना संसर्गाचा (corona virus) दर तीन टक्क्यांच्या आत आला आहे. साहजिकच, इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिकला अनलॉकचे (unlock) वेध लागले आहेत. असे असले तरी प्रशासन मात्र कुठलीही जोखीम घेण्याच्या मूडमध्ये नाही. अनलॉकनंतर नागरिकांची उसळणारी गर्दी आणि अशातच डेल्टा प्लस (delta plus varient) विषाणूची चिंता या पाश्वर्भूमीवर संसर्ग दर घटूनही लॉकडाउनच्या निर्बंध शिथलीकरणाची शक्यता नाही. (restrictions-remain-same-in-nashik-due-to-corona-third-wave-marathi-news)

प्रशासकीय यंत्रणा सतर्क

राज्यात कोरोनाचा संसर्ग दर (पॉझिटीव्हीटी रेट) पाच टक्क्यांच्या आत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश वर्ग दोनमध्ये करून तेथील बहुतांश कामकाज सुरू झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिसऱ्या वर्गातील नाशिकचा संसर्ग दर या आठवड्यात तीन टक्क्यांच्या आत आला आहे. २.८ टक्के संसर्गदर कमी झाला असला, तरी राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या अनुषंगाने राज्य सरकारने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेता व नागरिकांच्या विनाकारण गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

तिहेरी संकटाची धास्ती

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर त्याचा थेट रस्त्यावर परिणाम दिसतो. नागरिकांची प्रचंड गर्दी होते. संसर्गदर घटल्याच्या आनंदापेक्षा बेसुमार गर्दीमुळे रस्त्यावरून नागरिकांचा वावर जास्त धोकादायक वाटत आहे. आता तिसरी संभाव्य लाट आणि डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी, डेल्टा प्लस आणि संभाव्य लाट अशा तिहेरी अडचणीचा सामना करण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना संसर्गचा दर कमी होऊनही विषाणूंच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू केलेल्या निर्बंधामध्ये बदल करण्याच्या मनस्थितीत प्रशासकीय यंत्रणा नाही.

nashik crowd
कोरोना लसीकरणात नाशिक राज्यात सहाव्‍या क्रमांकावर

केंद्रस्थानी गर्दी

डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने प्रशासनाने विनाकारण गर्दी टाळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संसर्गदर घटूनही गर्दी व त्याद्वारे होणारा संसर्ग हेच आव्हान डोळ्यासमोर ठेवून आता निर्बंध शिथिल होण्याऐवजी गर्दीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाण्याची चिन्हे आहेत. संसर्ग दर घटूनही आठवडाभर तरी गर्दीच केंद्रस्थानी राहणार आहे.

nashik crowd
मानधनावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ; स्थायी समितीचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()