Nashik : शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू

jayant naiknavare
jayant naiknavareesakal
Updated on

नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police commissioner Jayant Naiknavare) यांच्या आदेशान्वये पुढील १५ दिवस प्रतिबंधात्मक मनाई आदेश (Restrictive restraining order) देण्यात आले आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहरात राजकीय पक्षासह सामाजिक संघटना व कामगार संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषण अन्य धार्मिक सण, यात्रा/ जत्रा इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशात कोठेही जातीय घटना घडल्यास त्याच्या प्रतिक्रिया शहरात उमटण्याची शक्यता असते. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तालय हद्दीसाठी नाईकनवरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी असून, सभा घेण्यास, मिरवणुकीसाठी पूर्व परवानगी लागणार आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृह आदींसाठी लागू नाही.

jayant naiknavare
Nashik : अवैध हातभट्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई

दरम्यान, कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा शस्त्रे, सोडायची किंवा फेकण्याची हत्यारे, तलवारी, काठ्या, बंदुका व शारीरीक इजा करण्यासाठी येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आहे. प्रतिकात्मक पुतळे व दहन, घोषणाबाजी, वाद्य वाजविणे, आवेशपूर्ण भाषणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे आदींवर बंदी घालण्यात आली आहे.

jayant naiknavare
आझादी का अमृत महोत्सव; NMC ची कचरा व्यवस्थापन व जनजागृती मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()