Nashik News: भुयारी गटारीची फेरनिविदा काढा; जादा दराने मंजुरीबद्दल आसिफ शेख पुन्हा आक्रमक!

Former MLA Asif Shaikh, along with former House Leader Aslam Ansari while speaking at a press conference regarding the tender for underground sewerage scheme in Malegaon.
Former MLA Asif Shaikh, along with former House Leader Aslam Ansari while speaking at a press conference regarding the tender for underground sewerage scheme in Malegaon.esakal
Updated on

मालेगाव : शहरासाठीच्या महत्वाकांक्षी ४९९ कोटीच्या भुयारी गटार योजनेच्या कामासाठी तब्बल चार महिन्यानंतर आयुक्त व निविदा समितीने दाखल चारपैकी दोन नाकारत दोन निविदा उघडल्या.

यातील नागपूर येथील इण्डो इंजिनिअरिग प्रोजेक्ट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीची २२ टक्के जादा दराची निविदा मंजूर केली आहे. ‘हा जादा दर लक्षात घेता योजनेसाठीचा खर्च ६१० कोटी रुपये होणार आहे.

मुळात निर्धारित रक्कमेत मनपाचा हिस्सा १५० कोटी आहे, त्यातच जादा दराचे ११० कोटी मनपालाच द्यावे लागतील. यामुळे या योजनेसाठी २६० कोटी रुपये सर्वसाधारण निधीतून महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

मनपा प्रशासनाने वाटाघाटीत निर्धारित दरानेच निविदा मंजूर करावी, अन्यथा फेरनिविदा काढावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. (Retender of subway sewers Asif Shaikh again aggressive about approval at excessive rate Nashik News)

श्री. शेख म्हणाले, भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार करण्याचा मनपा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप आपण सातत्याने करीत आहोत. जादा दराने निविदा मंजूर केल्यास त्यावर शिक्कामोर्तब होईल.

आयुक्त व निविदा समिती स्वत: हे धाडस करणार नाही. त्यामुळे त्यांना मालेगाव मध्यचे लोकप्रतिनिधी व बाह्यच्या मंत्रिमहोदयांचे पाठबळ आहे की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी याप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी.

११० कोटीचा जादा दराचा नाहक भुर्दंड मनपा निधी व अर्थातच शहरवासियांवर लादू नये. इण्डोची स्पर्धक असलेली दुसरी ईगल (कल्याण - उल्हासनगर) या कंपनीची निविदा ४२ टक्के जादा दराची होती.

त्याची किंमत सुमारे ७०० कोटी होत होती. अन्य दोन ऐलोरा व अंकिता या दोन निविदा तांत्रिक कारण देऊन उघडल्याच नाहीत. त्यामुळे उघडलेल्या दोन निविदा मॅनेज होत्या असा आरोप त्यांनी केला. या प्रश्‍नी आपण यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे.

आगामी काळात निर्धारित दराने निविदा न दिल्यास न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा त्यांनी दिला. दलित वस्ती सुधारणा विकास कामांच्या निविदेतही याच पद्धतीने कालहरण करून गैरव्यवहार झाल्याचा आरोप श्री. शेख यांनी केला.

Former MLA Asif Shaikh, along with former House Leader Aslam Ansari while speaking at a press conference regarding the tender for underground sewerage scheme in Malegaon.
Nashik Water Crisis: जिल्हा टंचाई कृती आराखडा 10 कोटीने वाढणार!

पत्रकार परिषदेला माजी सभागृह नेते अस्लम अन्सारी, फारूख कुरेशी, ॲडव्होकेट हिदायतुल्ला अन्सारी आदी उपस्थित होते.

चले जाओ म्हणणारे कुठे गेले...

मनपा आयुक्त शहराला दिवसेंदिवस लुबाडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी मनपाचे अंदाजपत्रक खिळखिळे करून ठेवले आहे. कमिशनर चले जाओ म्हणणारे शहरात जाहीर सभा घेऊन त्यांच्यावर टीकाटिप्पणी करीत होते.

मात्र आयुक्तांशी त्यांची बैठक झाल्यानंतर ते शांत कसे काय झाले असा आरोप त्यांनी ‘मध्य’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यावर केला.

Former MLA Asif Shaikh, along with former House Leader Aslam Ansari while speaking at a press conference regarding the tender for underground sewerage scheme in Malegaon.
Nashik News: सरस्वती नदीपात्रालगत अतिक्रमणावर हातोडा! सिन्नरला महसूल विभागाची पोलिस बंदोबस्तात कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.