Nashik News : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होणार आहे.
अटी शर्तीमध्ये बदल करून सल्लागार नियुक्त करण्यासाठी फेरनिविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. (ReTendering for Phalke Memorial Redevelopment Nashik News)
पांडव लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला. सुरवातीच्या काळात स्मारकाच्या माध्यमातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत होते. त्याशिवाय नाशिककरांना मनोरंजनासाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले.
२४ वर्षांमध्ये प्रकल्पावर १२ कोटी रुपये खर्च झाले आहेत, मात्र उत्पन्न मिळाले नाही. स्मारक जोपर्यंत महापालिकेमार्फत चालविले जात होते, तोपर्यंत फायद्यात होते. परंतु टप्प्याने आऊटसोर्सिंग सेवा दिल्या गेल्या तसे हा प्रकल्प तोट्यात गेला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्मारकाला पुनर्जीवित करण्यासाठी हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात संकल्पना आकाराला आली नाही. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून स्मारकाला ४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल, या अपेक्षेने सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली.
मात्र प्रतिसाद मिळाला नाही. निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आता नव्याने निविदा काढताना अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे.
टर्नओव्हर अट कमी करण्यात आली असून समकक्ष प्रकल्पाच्या अनुभवाच्या अटीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यात सुधारणा करून निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.