Nashik News : सेवानिवृत्त झालेल्या दोघांनी गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखास केशर जातीच्या आंब्याचे रोप भेट देत गावातील शाळेसाठी २१ हजाराची देणगी देत गावाप्रती आदरभाव व्यक्त केला आहे. (retired duo gifted saffron mango plant to head of each household in village nashik news)
सप्तशृंगीगड व मार्केंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेले भातोडे हे शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले गाव. ‘गावं एकत्र आलं तर काहीही अशक्य नसतं' याच उत्तम उदाहरण म्हणून सुमारे २७० हेक्टर वनक्षेत्रातील जंगल गावाने एकजुटीने संवर्धन करीत राखले आहे. या जंगलात दरवर्षी हजारो जातीच्या वृक्षांचे रोपण केले जाते.
वृक्षप्रेमी- वनप्रेमी असलेल्या गावातील रहिवाशी असलेले व संगमनेर (जि. नगर) येथील महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरीस असलेले नामदेव सोनू साबळे तसेच नाशिक महानगरपालिकेत उद्यान प्राधिकरणात सेवेत असलेले पोपट काशिराम पालवी हे नुकतेच अनुक्रमे ३४ व ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निवृत्तीनंतर ते आपल्या भातोडे गावी आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघांचे स्वागत करून सत्कार केला. या सोहळयात ग्रामस्थांनी प्रा. नामदेव साबळे व पोपट पालवी यांचा सत्कार केला. ग्रामस्थांचे वृक्षाप्रती असलेले प्रेम अधिक वृध्दींगत करण्यासाठी प्रा. साबळे व श्री. पालवी यांनी गावात असलेल्या तीनशे घरांना प्रती कुटुंब एक रोप याप्रमाणे तीनशे केशर आंबाच्या रोपांचे वाटप करून ग्रामस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा. साबळे यांनी ज्या भातोडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाऴेत शिकलो त्या शाळेला २१ हजाराच्या देणगीही जाहीर केली. गावातील प्रतिष्ठित आनंदा राऊत, रंगनात चव्हाण, नामदेव महाले, पंडित पालवी, किरण महाले, दशरथ महाले, अशोक भोये, पोलिस पाटील विजय राऊत, विश्वनाथ पालवी, सुनील जोपळे, देविदास गायकवाड, अशोक कुवर, जगदीश महाले, जगन भोये, भूषण चव्हाण, जयराम कुवर आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी, वनकमिटी पदाधिकारी यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.