Nashik News : निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांचा ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा

Nashik: Engineering Assistant in the Construction Department participated in the meeting held at the Martyrs' Memorial
Nashik: Engineering Assistant in the Construction Department participated in the meeting held at the Martyrs' Memorialesakal
Updated on

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक येत्या २४ फेब्रुवारीला नाशिकला अर्धनग्न आंदोलन करणार आहेत. सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

राज्यात एकाचवेळी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यायासमोरही सकाळी दहा ते दुपारी चारपर्यत हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नाशिकला हुतात्मा स्‍मारकात जे. एस. पाटील, पी. जे. पाटील, पी. के. गडाख, एम. एम. बुखुळ, पी. आर. बेलेकर, ए. व्ही. बैरागी, ए. व्ही. पाटील आदीच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. (Retired engineering assistant Warning of half naked Agitation Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Nashik: Engineering Assistant in the Construction Department participated in the meeting held at the Martyrs' Memorial
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम १९८२ मधील नियम १५ नुसार सर्व तेरा सर्वंगातील कर्मचाऱ्यांचे पद नामांतर करुन समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १ जानेवारी ८९ ला समाविष्ट करून त्यानुसार वेतननिश्चिती करावी.

१ आॅक्टोबर १९९४ ला कालबध्द पदोन्नती अंर्तगत पहिला लाभ मिळावा, आॅक्टोबर २००६ च्या आश्वासित प्रगती अंर्तगत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा. वित्त विभागाच्या शुध्दीपत्रकानुसार १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत दिलेल्या वेतनवाढीचा फरक रोखीने अदा करावा या मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे.

Nashik: Engineering Assistant in the Construction Department participated in the meeting held at the Martyrs' Memorial
Satara News: साताऱ्यात रुजतेय गुन्हेगारीची नवी संस्कृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.