Retire Teacher Pension : निधीअभावी रखडले सेवानिवृत्त शिक्षकांचे पैसे

Teacher
Teacheresakal
Updated on

Nashik News : बागलाण तालुक्यातील५० सेवानिवृत्त शिक्षक व प्राथमिक शिक्षकांचे सुमारे सात वर्षापासून २२ कोटी रुपये फरक बिले मंजूर होऊनही वर्षाच्या शेवटी मार्च अखेरीसही निधीअभावी रखडल्याने ऐन लग्नसराईत मुले, मुलींच्या लग्नाला हक्काचे पैसे मिळत नसल्याने शिक्षकामध्ये संतापाची लाट आहे. (Retired teacher money stopped due to lack of funds nashik news)

तालुक्यातील सुमारे ५० शिक्षक निवृत्त होऊनही २०१६ पासून ते मार्च २०२३ पर्यंत असा सात वर्षाचा कालावधी उलटून देखील पेन्शन, अंश राशीकरण व उपदान अनुदान हक्काचे वीस कोटी रुपये या शिक्षकांना मिळालेले नाही.

त्यामुळे या शिक्षकांवर आता आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. यातच काही शिक्षकांच्या घरात मुला,मुलींचे लग्न आहे. हक्काचा पैस असूनही तो मिळत नसल्याने निवृत्त शिक्षक हे संतप्त झाले आहे.

यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सुमारे तीन वर्षापासून आई-वडील, मुलगा मुलगी, पत्नी यांचे मेडिकल बिले, रजा कालावधीतील मंजूर बिले, शालार्थ प्रणाली, पगाराचे वेतन असूनही मिळाले नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
Farmer Protest : ‘शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण...! शेतकऱ्यांचा रास्तारोको

ह्रदयशस्त्रक्रिया, मेंदूचे आजार , फंडाचे पैसे आदी बिले मंजूर होऊनही शिक्षकांना सुमारे दोन कोटी रुपये मिळाले नसल्याने शिक्षकासह सर्व संघटनांनी या गोष्टीचा निषेध केला. शासनाने तत्काळ यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सेवानिवृत्त पेन्शनधारक संघटना आणि शिक्षक संघटना यांनी केली आहे.

"तालुक्यातील सुमारे ५० सेवानिवृत्त शिक्षकांचे सहा वर्षांपासून पेन्शन, अंशराशी, व उपदान योजना अनुदान असे हक्काचे २० कोटी हक्काचे अनुदान मार्च अखेर होऊनही न मिळाल्याने अनेक आर्थिक अडचणी सेवानिवृत्त शिक्षकांपुढे उभ्या राहिल्या आहेत." - युवराज पवार, राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ

"सेवानिवृत्त शिक्षकांसह प्राथमिक शिक्षकांचे सुमारे २२ कोटी रुपये फरक बिलांचे अनुदान अडकले असून वर्षाच्या मार्च अखेरीस ही बिले शिक्षकांना मिळत नसल्याने शासनाने यात लक्ष घालून समस्या सोडवाव्यात." - वामन खैरनार, मुख्य संघटक जिल्हा शिक्षक समिती.

Teacher
Nashik Crime : रेशनच्या गव्हाची काळ्या बाजारात विक्री; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.