NMC News : एकाही विभागाकडे हालचाल नोंद रजिस्टर नसल्याची बाब उघड!

NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : स्थळ पाहणीच्या नावाखाली कामांना टप्पे देणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्थळ पाहणीसाठी जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी एकाही विभागाकडे हालचाल नोंद रजिस्टरच नसल्याची बाब समोर आली आहे. (Revealed that no department has movement record register at NMC Nashik Latest Marathi News)

२०१६ पासून महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महापालिकेच्या विविध उपकार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी व कार्यालयीन कामकाज बंद होत असताना असे दोनदा बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे.

मात्र, बायोमेट्रिक हजेरीतून अधिकारी तसेच अभियंत्यांना सूट देण्यात आली आहे. ही सूट देताना हालचाल नोंदवहीमध्ये हाताने नोंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत अनेक अधिकारी स्थळ पाहणीच्या नावाखाली गायब असतात. आयुक्तांकडून ज्या वेळी अधिकाऱ्यांना विचारणा होते, त्या वेळी साईटला गेल्याचे उत्तर देऊन टाळाटाळ केली जाते.

NMC News
Smart City Road : जलवाहिनी टाकण्यासाठी स्मार्ट रस्त्याची पुन्हा तोडफोड

त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सदर बाब गांभीर्याने घेत हालचाल नोंदवही मध्ये नोंद करण्याबरोबरच आयुक्तांना स्थळ पाहण्याची माहिती आयुक्तांना देणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या पोर्टल किंवा ॲपमध्ये हालचाल नोंदवहीप्रमाणे सुविधा निर्माण करण्याच्या सूचना माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिल्या.

आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी करत असताना महापालिकेच्या एकूण ४३ विभागाकडे हालचाल नोंद रजिस्टरच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा ॲपमध्ये स्थळ पाहण्याची नोंद करणे बंधनकारक ठरणार आहे.

NMC News
AIDS Testing Centerचा नाशिकला मान; MICO Hospitalला ‘NABL’ प्रमाणपत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.