Nashik Crime : अवैध धंद्यांविरोधात शिवसेनेच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर गेले वर्षभर चर्चेत असलेल्या सारूळ येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या खाणीवर अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आणि प्रांताधिकारी जितीन रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तीन पथकांद्वारे गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री उशिरा कारवाई करण्यात आली. (Revenue action on mines in Sarul area nashik crime news )
ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. सारूळ येथील खाणी आणि क्रशरवर बंदी असतानाही तब्बल पाच ते सहा ठिकाणी क्रशर सुरू असल्याचे आढळल्याने गौण खनिजाची अवैधरीत्या वाहतूक करणारी दोन वाहने जप्तीची कारवाई करण्यात आली.
नाशिक शहरालगत परिसरातील डोंगरांचे विद्रुपीकरण झाले आहे. खाणी माफियांनी डोंगर कापून काढले. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींनंतर अखेर येथील १९ क्रशरवर कागदोपत्री बंदी घातली गेली. खाणी सुरूच होत्या. महसूलमंत्र्यांनी अवैध उत्खननाची त्रयस्त पथकाद्वारे तपासणी केली. त्याचाही कारवाईचा अहवाल बासनात गुंडाळला गेला.
मात्र, अशा परिस्थितीत शिवसेनेने अवैध धंद्याविरोधात मोर्चाचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी पहाटेपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि निफाड व दिंडोरीच्या तहसीलदारांच्या पथकाने सारूळमध्ये जाऊन खाणींवर कारवाई केली. कारवाई पथकातील वरिष्ठ दोन अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कुणालाही या कारवाईची कल्पना न देता जेवणासाठी जायचे असल्याचे सांगून पुढील तासाभरात कारवाई झाली.
कारवाईत दोन वाहने जप्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात नंबर नसलेली हायवा आणि डबर भरलेला ट्रक जमा करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईत पाच खडीक्रशर आणि खदाणींवर कारवाई करीत रेकॉर्ड, आवक-जावक रजिस्टर ताब्यात घेण्यात आले. वीजबिल युनिटची माहिती सादर करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.