Nashik News : महसुलीचे उदिष्ट ‘सफल’! मार्च एण्ड पूर्वीच 118 टक्के महसुल वसुली

Revenue Collection
Revenue Collectionesakal
Updated on

नाशिक : २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचे महसुली उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. महसुली उद्दिष्ट साध्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे हे चौथे वर्ष असून, सुमारे २२८ कोटींचा महसुल संकलित केला आहे.

शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ११८ टक्के वसुली जिल्हा प्रशासनाने करीत मार्चएण्डपूर्वीच उद्दिष्ट साध्य केले आहे. (Revenue target successful 118 percent revenue collection in March end before Nashik News)

मार्च महिन्यात बँकांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही आर्थिक वर्षाचा ताळेबंद लावण्यासाठी धावाधाव सुरू असते. जिल्हाधिकारी प्रशासन कार्यालयात मात्र गेल्या चार वर्षांपासून मार्चएण्डपूर्वीच उद्दिष्ट साध्य करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

त्यामुळे आर्थिक वर्षात प्रशासनाने १०० टक्के महसुल वसुली करीत सलग चौथ्यावर्षी विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला १९३ कोटी ५५ लाखांच्या महसुली वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.

यात गौणखनिजच्या ९८.१६ कोटी, तसेच जमीन महसुलच्या ९५.५० कोटी रूपयांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने मार्चएण्डला तीन दिवस शिल्लक असतानाच, तब्बल २२८ कोटी ५० लाख ५९ हजारांचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Revenue Collection
NDCC Bank News : जिल्हा बॅंकेकडून 455 संस्थांची कमाल मर्यादा पत्रके मंजूर!

यात, गौण खनिजचे १५५ कोटी ७३ लाख १६ हजार रूपये. जमीन महसुल वसुली ७२ कोटी ७७ लाख ४२ हजार रूपये आहेत. शासन स्तरावरून गौण खनिजपोटी देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १५८ टक्के तर, जमीन महसुलची ७६.२० टक्के वसुली जिल्हा प्रशासनाने गाठली.

जिल्ह्यात सिन्नर आघाडीवर

जिल्हा प्रशासनाच्या महसुल वसुलीच्या यादीत सिन्नर तालुका अव्वलस्थानी राहिला आहे. तालुक्याला २६.६६ कोटींचे उद्दिष्ट असताना, प्रशासनाने ४०.९८ कोटींची म्हणजेच तब्बल १५४ टक्के महसुल संकलित केला आहे.

तर, निफाड तालुक्यात सर्वात कमी १५.०८ कोटीपैकी अवघी २० टक्के वसुली झालेली आहे. दरम्यान, नाशिक तालुक्यात ९९ टक्के वसुली झाली असून, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर व नांदगाव तालुक्यांनीही उद्दिष्ट गाठले आहे.

Revenue Collection
Nashik News: 'ऐ भाई जरा देख के चलो' अंबासन ते निमधरा फाट्यावरील रस्त्यावर खड्डे दुरूस्तीचा मुहूर्त मिळेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.