Nashik News: मनमाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन! पाणीपुरवठा होणार पूर्ववत

Recirculation water released to Palkhed canal
Recirculation water released to Palkhed canalesakal
Updated on

Nashik News : शहरावर उद्भवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले असून गुरुवारी (ता.१०) सकाळी पाटोदा येथील साठवण तलावात हे पाणी घेतले जाणार आहे.

आवर्तनाचे पाणी सुटल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. हे पाणी वागदर्डी धरणात पोचल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होणार आहे. (Reversal from Palkhed Dam for Manmad Water supply will be restored Nashik News)

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. धरणात मृत साठाच शिल्लक असल्याने शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत होता.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. तरी दमदार पाऊस नसल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. धरणात पाणी नसल्याने शहराला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता.

पालखेड धरणात आरक्षित असलेल्या पाण्याच्या आवर्तनाची अत्यंत गरज होती. पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिले तसेच आमदार सुहास कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले.

पाटोदा येथील साठवण तलावात तीन दिवसात या आवर्तनाचे पाणी १५ एमसीएफटी मिळणार आहे. तेथून ते वागदर्डी धरणात पंपिंग केल्यानंतर त्याचा शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Recirculation water released to Palkhed canal
Nashik Rain Update: उंबरदरी धरण ‘ओव्हरफ्लो’! अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला

मात्र वागदर्डी धरणाची क्षमता ११० एमसीएफटी असल्यामुळे पाण्याचे नियोजन करणे मोठ्या अडचणीचे ठरणार आहे. हे पाणी २ महिने पुरण्याची शक्यता आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल, पाणीपुरवठा अधिकारी अमृत काजवे यांनी पाटोदा साठवण तलावावर भेट देऊन पाहणी करत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

"वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे मनमाड शहरावर पाणी संकट उभे राहिले होते. त्यामुळे पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी तातडीने मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. पत्राची दखल घेत तातडीने आवर्तनाचे पाणी सोडले आहे."

- सुहास कांदे, आमदार

"पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. पाटोदा तलावात पाणी घेतले जाईल. तेथून वागदर्डी धरणात घेऊन शहराला पाणीपुरवठा केला जाईल. आवर्तनाचे पाणी दोन महिने पुरणार असले तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे."

- डॉ. सचिन कुमार पटेल, मुख्याधिकारी

Recirculation water released to Palkhed canal
Nashik Kharif Season Crisis: देवळा तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात! पाऊस नसल्याने पिके करपण्यास सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.