Nashik: निमा पदाधिकाऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा; प्रश्न मार्गी लावण्याचे MIDCचे गवळी, झांज्जे यांचे आश्वासन

NIMA President Dhananjay Bele and office bearers while presenting the problems in the meeting held on Monday with the MIDC officials
NIMA President Dhananjay Bele and office bearers while presenting the problems in the meeting held on Monday with the MIDC officialsesakal
Updated on

Nashik News : नाशिक, माळेगाव (सिन्नर) येथील औद्योगिक वसाहतीतील पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, घंटागाड्या, कचऱ्याची विल्हेवाट, पथदीप यांसह तेथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ११) बैठक होऊन विविध प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांवर केली.

दरम्यान, हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांनी दिले. (Review of issues raised by NIMA office bearers Gawli Zanjje of MIDC assured to sort out issue Nashik)

सिन्नर-माळेगाव तसेच तळेगाव- अक्राळे या दिंडोरी तालुक्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली निमाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १०) एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवावी, हा मुद्दा चर्चेला आला. १४ एमएलडीवरून ही मर्यादा २० एमएलडी करावी, पाण्याचा दर्जा सुधारावा असा आग्रह उद्योजकांनी धरला असता, सध्याचे जे आरक्षण आहे ते पुरेसे आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले.

परंतु भविष्यातील उपलब्धता लक्षात घेऊन ही मर्यादा वाढविणे गरजेचे आहे, असे निमा पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले असता त्यात काही अडचण नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निमाच्या पाठपुराव्यानंतर नऊ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले माळेगाव औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे, उद्योजकांना भूखंडाचे वाटप झाले मात्र सर्व्हिस रोडची मागणी अजूनही प्रलंबित असून, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रवेशद्वार कमान उभारण्यास मंजुरी मिळावी याकडे लक्ष वेधले असता, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

तसेच या वसाहतीतील काही रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. ठेकेदारांना नोटिसा द्या, त्यांना ब्लॅक लिस्ट करा, अशी मागणी आली असता त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्कीच याबाबत कार्यवाही करू, असे सकारात्मक उत्तर दिले.

तसेच माळेगाव औद्योगिक वसाहतीकरीता अतिरिक्त वीज उपकेंद्र उभारण्याकरिता ॲम्युनिटीचा प्लॉट देण्याबाबतच्या मागणीबाबत श्री. गवळी यांनी तातडीने लक्ष घालून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NIMA President Dhananjay Bele and office bearers while presenting the problems in the meeting held on Monday with the MIDC officials
Nashik: येवल्यासह तालुक्यात नवे 13 रेशन दुकाने! तहसिल कार्यालयाकडून अकार्यान्वित दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध

बैठकीत दिंडोरी तालुक्यातील आक्रळे-तळेगाव औद्योगिक वसाहतीत भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही चर्चा झाली. विद्युत सबस्टेशन, फायर स्टेशन, ट्रक टर्मिनस, सीईटीपी प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

अंबड, सातपूर व सिन्नर येथे येत असलेल्या अडीअडचणी या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये होऊ नये, तसेच माळेगावला लागून होत असलेल्या अतिरिक्त माळेगाव एमआयडीसीच्या जागेमध्येसुद्धा या अडचणी येऊ नये, यासाठी आधीच तरतूद करून ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला.

चर्चेत निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष आशिष नहार, किशोर राठी, कोषाध्यक्ष विरल ठक्कर, किरण वाजे, सुधीर बडगुजर, प्रवीण वाबळे, नितीन वागस्कर, मनीष रावल, सचिन कंकरेज, कैलास पाटील, गोविंद झा, सतीश कोठारी, समीर देशमुख, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, सिन्नरचे उपअभियंता मनोज पाटील व शशिकांत पाटील, अंबडचे उपअभियंता जयवंत पवार, तसेच अन्य अधिकारी यांनी सहभाग घेतला.

बेळेंनी घेतले फैलावर अधिकारी

अधिकारी- पदाधिकारी बैठकीत बेजबाबदार आणि उडवाउडवीची उत्तरे देणारे नवनियुक्त उपअभियंता मनोज पाटील यांना निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी फैलावर घेतले.

कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा बेळे यांनी या वेळी इशारा दिला.

बैठकीत महत्त्वाचे निर्णय

-सीसीटीव्ही कॅमेरे संयुक्तरीत्या बसविले जाणार

- माहितीचे दिशादर्शक फलक लावले जाणार

- पाणीबिल संकलन केंद्राची वेळ वाढवून मिळणार

- आठवड्याभरात पथदीप सुरू होणार

- कचऱ्याची विल्हेवाटसंदर्भात सिन्नर व नाशिक पालिकेशी संवाद साधला जाणार

- ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव शासनास सादर

-शिंदे- पळशे येथे जकात नाक्याच्या जागेवर ट्रक टर्मिनससंदर्भात विचार करणार

NIMA President Dhananjay Bele and office bearers while presenting the problems in the meeting held on Monday with the MIDC officials
Mock Drill: इगतपुरी रेल्वेस्थानकात अतिरेकी घुसतात तेव्हा...; नागरिकांमध्ये उडाली प्रचंड खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.