Nashik News : आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे यशस्वी पाठपुरावा केल्याने गिरणा धरणावरील पांझण डावा कालव्याच्या आवर्तनाला मंजुरी मिळाली.
मंगळवारी (ता. २६) कालव्याला प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले. ऐन दुष्काळात पाटकालवा खळखळून वाहताना पाहून लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला. (Revival of Canal for first time in 50 years by mla suhas kande nashik news)
आमदार कांदे यांच्या हस्ते पाटाच्या पाण्याचे विधिवत जलपूजन करण्यात आले. कळवाडीसह विविध गावातील नागरिकांनी कांदे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते.
गेल्या पन्नास वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना कालव्याला कधीही पाणी सोडण्यात आलेले नाही. यावर्षी देखील अत्यल्प पावसामुळे धरणात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते. आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
२९ नोव्हेंबरला जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. यामुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. दुष्काळी परिस्थिती असताना पाटाला आलेल्या पाण्याने शेतकरी सुखावले आहेत. आमदार कांदे म्हणाले, की शेतकरी बांधवांमुळेच मी आमदार आहे. आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते.
दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही पाटाला पाणी आल्याचा मलाही आनंद होत आहे. लवकरच परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सर्व गावांकरीता पाणी आरक्षित केले जाईल. उर्वरित गिगाव, दहिवाळ, रोझे, पाडळदे, शेरूळ, हिसवाळ या गावांना लिफ्टद्वारे पाणी मिळवून दिले जाईल.
आतापर्यंत विकासकामे बहुसंख्येने मार्गी लागली. यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करण्यात येईल. मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला मुबलक पाणी मिळेल अशा स्वरूपाचे काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी डीजे लावत आमदार कांदे यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, गटप्रमुख दिनकर महाले, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, यशवंत देसले, प्रदीप देसले, रोहित जाधव, बाळू बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले.
जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पी. डी. चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मीनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.