Nashik Rain Crisis: इगतपुरीत भात शेती संकटात; पर्जन्यमानात 23 टक्के घट

In the high rainfall areas of the taluka, rice was planted at the beginning, so the crop stood tall.
In the high rainfall areas of the taluka, rice was planted at the beginning, so the crop stood tall.esaka
Updated on

Nashik Rain Crisis : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन बहरात आलेली भात शेती संकटात सापडली आहे. सध्या भात पीक पोगा व पोटरीच्या भरतीवर आहे.

या काळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, पाऊसच गायब झाल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. (Rice farming in Igatpuri crisis 23 percent decrease in rainfall Nashik)

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमानात २३ टक्क्यांची घट झाली आहे. पावसाअभावी तालुक्यात काही भागात पिकांवर परिणाम दिसू लागला असून, उत्पादन क्षमता घटण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी २९ ऑगस्टअखेर तालुक्यात तीन हजार ८४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र २९ ऑगस्टपर्यत केवळ दोन हजार ६११ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. २२.७३ मिलिमीटरने यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला सरासरी ९५ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तविला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जुलैमध्ये पाऊस सुरू झाला.

जुलै व ऑगस्टमध्ये काही दिवस दमदार वृष्टीही झाली. सध्या विश्रांती घेतल्याने बळीराजाचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही.

सुरवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पावसाळा उत्तरार्धात आला, तरी दमदार पाऊस झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In the high rainfall areas of the taluka, rice was planted at the beginning, so the crop stood tall.
Nashik News: दिव्यांग कल्याण विभाग पाचला ‘दिव्यांगांच्या दारी’! नाशिक व मालेगावात नोडल अधिकारी

जिल्हा अजूनही कोरडाच

पावसाळा सुरू झाल्यापासून अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके हिरवी दिसत असली, तरी त्यांची उत्पादन क्षमता घटली आहे. येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, सटाणा, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये सोयाबीन, मका, बाजरीची पिके करपली आहेत.

शेतकरी पिकांचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून करू लागले आहेत. इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस झाल्याने जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या तालुक्यातील धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.

मात्र, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, निफाड, सिन्नर, येवला आदी तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत केवळ निम्मे पर्जन्यमान झाले आहे. पावसाळा संपत आला, तरी यंदा अद्याप विहिरी, नदी- नाले, तलावांना पाणी न आल्याने अनेक ठिकाणी टॅँकर सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्याकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

इगतपुरी तालुक्यात ८० टक्के पाऊस

इगतपुरी तालुक्यात सुमारे ८० ते ८५ टक्के पाऊस नोंदवला असला, तरी भातासाठी पावसाची प्रतिक्षा आहे.

या आठवड्यात पाऊस न झाल्यास भात पिकावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होईल, पण विविध रोगांचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाचा जीव भांड्यात पडला आहे.

In the high rainfall areas of the taluka, rice was planted at the beginning, so the crop stood tall.
Nashik News: पोलिस आयुक्तालयातर्फेही ‘ई-एक खिडकी’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.