Agriculture News : भाताची 29 हजार हेक्टरवर होणार लागवड; खते, बियाण्यांच्या उपलब्धतेची तयारी

Rice farming
Rice farmingSakal
Updated on

Nashik News : भाताचे आगर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरिपाची तयारी सुरू असून कृषी विभाग सज्ज झाला आहे. विविध मशागतीच्या कामांमध्ये बळीराजा गुंतला असून कृषी विभागाकडूनही हंगामासाठी नियोजन सुरू आहे. (Rice will be planted on 29 thousand hectares in igatpuri nashik news)

भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा सर्वसाधारणपणे ३३ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर विविध हंगामी पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यात साहजिक तालुक्यात २९ हजार २०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे.

तालुक्यात १२६ महसूली गावे व वाड्यामधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरसणी, मका व इतर पिके घेतात. खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भातपिके घेण्यास प्राधान्य देतात.

तालुक्याचे खरीप हंगामाचे भातासाठी सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार हेक्टर असून यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३३ हजार १३० हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी दिली.

इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. भातासाठी पोषक असे वातावरण असलेल्या व पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rice farming
Nandurbar Agriculture: कापूस घरात अन् नवे वाण आले बाजारात..! खरिपाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी कोळपी, १००८, वाय.एस आर, हळे, पूनम, डी १००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रूपाली, रूपम, विजय, आवणी लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी, १००८, वर्षा, राजेंद्र यासह बासमती आदी प्रमुख भाताच्या जातींचे उत्पन्न घेतले जाते.

भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात होते. मात्र भात शेतीचा वाढता खर्च पाहिल्यास ही शेती करणेही आता सोपे राहिलेले नाही. आज खतांच्या वाढणाऱ्या किमती, बी बियाणे, औषधे वापरून शेतकरी मेटाकुटीस येत आहे. खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे तर भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो.

दरम्यान गेल्यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी काही गावांमधील मातीचे नमुने घेण्यात आले आहेत. गावपातळीवर मृदा आरोग्य पत्रिकेत शिफारशीप्रमाणे खत वापरण्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात येणार आहे.

Rice farming
Jalgaon Agriculture News : यंदा मॉन्सूनच्या लहरीपणावरच ‘पीकपाणी’

यंदा मक्याचे क्षेत्र वाढणार

कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा भात व मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. वरई म्हणजेच भगरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वरई पिकाकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

खतांचा आवश्यक तेथे मागणीप्रमाणे पुरवठा होणार असून खताचा तुटवडा पडू नये म्हणून जिल्हास्तरावर बफर स्टॉक करण्यात येत आहे. बियाणे आवश्‍यकतेप्रमाणे उपलब्ध होईल असे नियोजन करण्यात आलेले आहे.

असे आहे खरिपाचे नियोजन

पीकनिहाय लागवडीचे उद्दिष्ट्य (हेक्टर)

भात : २९ हजार २०० हेक्टर
नागली : ७८० हेक्टर
वरई : ८०० हेक्टर
मका : २३२ हेक्टर
भुईमूग : ३८६ हेक्टर
सोयाबीन : ९३८ हेक्टर
खुरसणी : ५१८ हेक्टर
मूग : ४०८ हेक्टर
तूर : ८० हेक्टर
उडीद : ६६ हेक्टर

"यंदाच्या खरीप हंगामात इगतपुरी तालुक्यात तृणधान्य विकास योजनेअंतर्गत प्रचार व प्रसिद्धी करून व नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडे पोचवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना विविध कडधान्याच्या उत्पादकतेची वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण, शेतीशाळा व तांत्रिक मार्गदर्शन याचे पुरेपुर नियोजन करण्यात आलेले आहे." - शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.

Rice farming
Nashik Agriculture News : पेरणी योग्य पावसानंतरच कपाशीची लागवड करा : गोकुळ अहिरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()