Nashik News : शहरातील धार्मिक व ऐतिहासिक ठेव्यांची माहिती कधीकाळी पंचवटीत कार्यरत परवानाधारक गाइडकडून दिली जात होती. कोरोनापासून या गाइडचे काम ठप्प झाल्यावर ती जागा आता रिक्षाचालकांनी घेतली आहे.
त्यामुळे हे काम करून उपजीविका करणाऱ्या शंभराहून अधिक गाइडवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. (rickshaw driver giving information to tourist as guide nashik news)
शहरातील पंचवटी भागातील धार्मिक महत्त्व सातासमुद्रापार आहे. येथील श्री काळाराम, सीता गुंफा, तपोवन, श्री कपालेश्वराची भुरळ देशांसह विदेशातील अनेकांना आहे. त्यामुळे येथील धार्मिक पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. सलग सुटी असल्यास गंगाघाटावरील पार्किंगसाठी जागाही अपुरी पडते, यावरून येथील धार्मिक पर्यटनाचे महत्त्व लक्षात यावे.
या पर्यटकांना पंचवटीतील धार्मिक स्थळे दाखविण्यासाठी कधीकाळी गाइड उपलब्ध होते. या गाइडकडून चांगले काम उभे राहात असल्याने व त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्याकडून संबंधित गाईडला रीतसर परवानेही (बिल्ला) जात होता. त्यामुळे या व्यवसायावर पंचवटीतील अनेकजण अवलंबून होते. कोरोनाकाळात सर्वच ठप्प झाल्याची झळ या पर्यटनालाही बसली.
त्यामुळे गाइडचे काम करणाऱ्या शंभराहून अधिक जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. विशेष म्हणजे यात काही महिला गाईडही सक्रिय होत्या. कोरोनानंतर अनेक रिक्षाचालकांनी रिक्षाच्या व्यवसायाला गाईडची जोड दिली. या व्यावसायिकांनी गाइड जशी माहिती देतात, त्याच पद्धतीने माहिती देणे सुरू केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यासाठी अनेक रिक्षाचालकांनी गाइड जशी माहिती देतात, ते तंत्रही आत्मसात करून घेतले. त्यामुळे सहाजिकच यात्रेकरूही गाइडचे पैसे वाचतात. म्हणून रिक्षाचालकांकडूनच माहिती घेण्यास सुरवात केली. त्यामुळे गाइडचे महत्त्व घटतच गेले. पर्यायाने आज पंचवटीत हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच गाइड शिल्लक राहिले आहेत.
रिक्षाबाबत तक्रारीत वाढ
गंगाघाटावर राज्यासह परराज्यातील भाविकांची बारमाही गर्दी असते. भल्या सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी प्रवासी वाहने दाखल होतात. एखादे वाहन गंगाघाटावरील पार्किंगमध्ये लावताच हे रिक्षाचालक संबंधित गाडीला गराडा घालून कोठे जायचे याची विचारपूस करतात.
तसेच कमी अंतर असूनही अधिक अंतर असल्याचे सांगून दामदुप्पट पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी आहेत. रिक्षात बसण्यास नकार दिल्यास अरेरावी केली जात असल्याचाही अनुभव अनेक यात्रेकरूंनी कथन केला.
"कधीकाळी पंचवटीत मोठ्या प्रमाणावर गाइड यात्रेकरूंना अल्प पैशात मार्गदर्शन करत असतं. आता गाईडची जागा रिक्षाचालकांनी घेतल्याने गाईवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे." - श्रीकांत जोशी, पंचवटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.