नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी स्वत:कडे घेतलेले गौण खनिजविषयीचे अधिकार नव्या वर्षात पुन्हा नूतन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे सोपविले आहेत.
गतवर्षी जिल्ह्यातील खाणपट्टे बंद करण्याचे आदेश निघत असताना ते आदेश काढणारे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून प्रशासकीय निकड व तातडीची बाब म्हणून गौण खनिज उत्खनन व त्याविषयक बाबींचे कामकाज काढून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी १३ सप्टेंबरला स्वत:कडे घेतले होते. (Rights about secondary minerals again to Upper District Collector Nashik News)
तेव्हापासून अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक, साठवणूक याबाबत कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्धचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होणारे अपील, पुनर्परीक्षणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःकडे घेतले होते.
दरम्यान, मागील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडील अधिकार काढल्याने गौण खनिज अधिकाऱ्यांकडून खाणपट्ट्याची प्रकरणे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे जायची. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी नडे यांच्या बदलीनंतर बाबासाहेब पारधे यांनी पदभार स्वीकारला. मात्र ११४ दिवसांनी ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.