नाशिक : इंधनाच्या दरवाढीने उत्पादन खर्चात वाढ; शेतकरी हैराण

Farmer Harrased
Farmer Harrasedesakal
Updated on

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : मजुरांचा तुटवडा, शेती कामांची धांदल, वेळेची बचत आणि नवनवीन साधनांमुळे यांत्रिकी साधनांचा वापर शेतीच्या विविध कामांत होत आहे. मात्र, आता भरमसाठ इंधन दरवाढीचा फटका शेतीला बसत आहे. रब्बीचा सरता हंगाम अन्‌ उन्हाच्या काहिलीतून मुक्त होऊ पाहणारा शेतकरी राजा इंधन दरवाढीच्या चटक्यांनी हैराण झाला आहे. उत्पादनपूर्व खर्चात (Pre Production cost) वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

इंधनातील दरवाढ मोठी...शेतीमालाचे दर मात्र...

प्रतिलिटर अतिशय कमी उतारा देणारी वाहने शेती कामात वापरली जातात. त्यात अडचणीच्या जागांवर ये-जा करावी लागत असल्याने ट्रॅक्टरसह अन्य वाहनांना जास्तीचे इंधन खरेदी करावे लागते. इंधनाचे भरमसाठ दर वाढल्याने शेतीकामांचे दरही वाढले आहेत. याचा थेट फटका शेती उद्योगाला बसत आहे. शेती मशागत, काढणी, मळणी आणि विक्रीसाठी वाहतूक या कामाचे दर वाढले आहेत. उत्पादनपूर्व खर्चात इंधन दरवाढीमुळे मोठी वाढ आणि शेतीमालाचे नीचांकी दरामुळे शेती उद्योग कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. शासनाच्या आयात निर्यात धोरणातील अनाकलनीय धोरणामुळे शेती उत्पादने मातीमोल भावात विक्री होत आहे.

Farmer Harrased
Fuel Price Hike: इंथन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

निसर्गाने तारले... इंधनाने मारले...

मागील वर्षी चांगला पाऊस आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणामुळे गहू पिकाने (Wheat crop) एकरी चांगला उतारा दिला. एकरी १२ ते १४ क्विंटल उतारा मिळत आहे. शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने तारले आणि इंधनाने मारले, अशी स्थिती झाली आहे. जास्तीचा एकरी उतारा औटघटकेचा बनला आहे. ट्रॅक्टर, हार्व्हेस्टरच्या मालकांनी शेतीकामाचे दर वाढविले. दरवाढीत मजुरांनीही रोजंदारीत वाढ केल्याने उत्पादक दुहेरी कचाट्यात सापडला आहे. शेती नफ्याची होऊच नये, असेच सरकारी धोरण असल्याची चर्चा बांधाबांधावर होत आहे. शेतीच्या नाजूक प्रश्नांवर सरकार सूक्ष्म लक्ष देत नसल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. कर्जबाजारीपणा वाढीच्या कारणांचा शोध आणि बोध घेतल्यास सरकारला इंधन दरवाढीचा खरा ‘बळी’ लक्षात येईल, अशी अटकळ व्यक्त होत आहे. शेती उद्योग अधिक कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. अल्प उत्पादन खर्च व चांगल्या बाजारभावातून कर्जफेड व स्वयंभू शेतीचे स्वप्न पाहणारा बळीराजा हतबल झाला आहे.

Farmer Harrased
Medicine Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधंही महागणार

यांत्रिकी शेतीचे वाढलेले दर (एकरी दर) (आकडे रुपयांत)

क्र/काम व साधन/गत वर्षाचा दर/सध्याचे दर/वाढ

१) पेरणी/ ८००/ ११००/ ३००

२) नांगरणी/ ८००/ १०००/ २००

३) पलटी/ १४००/ १६००/ २००

४) रोटर/ १०००/ १३००/ ३००

५) हार्व्हेस्टर/ १६००/ २०००/ ४००

"मोठमोठ्या लागवड क्षेत्रात शेतीकामांचे नियोजन करणे अवघड झाले आहे. इंधन दरवाढीने शेतीची सर्व कामे प्रभावित झाले आहेत."

-अरुण देवरे, फळबाग उत्पादक, दाभाडी

"आता यांत्रिकी शेतीऐवजी पुन्हा मजुरांचा आधार घेऊन शेती करणे शक्यच नाही. इंधनाचे गगनाला भिडलेल्या दराने शेती उद्योग उद्ध्वस्त करून टाकला. सरकारने दर रोखायला हवेत."

-संजय निकम, प्रयोगशील शेतकरी, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.