Nashik News : राज्यासह जिल्हयात उष्णतेची लाट असून, उष्माघाताचा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागही सज्ज झाला आहे.
केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी पार झाल्याने जनावरांना विविध आजारदेखील उद्धभवू शकतात. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे.
याबाबत पशुसंवर्धन विभागाने काही सूचना दिल्या आहेत. त्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे. (Risk of heat stroke to animals too Measures taken by District Animal Husbandry Department Nashik News)
उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने करावयाच्या उपाययोजना सांगितले असून, त्यानुसार जिल्हाभरात या उपयोजनांची अवलंब करण्याचे निर्देश पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले आहेत.
सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना जनावरे चरण्यास सोडावे. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत.
अनेकदा जागेअभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्यावेळी भरउन्हात बांधली जातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा चटका बसू नये, यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी.
उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे त्यांना थंड वातावरणात चारा टाकावा. म्हशींना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो, त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी, अशी माहिती डॉ. गर्जे यांनी दिली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
हवामानपूरक गोठे असावे
हवामानपूरक गोठे असावेत , हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा, लसीकरणे करून घ्यावे आदी.
टोल फ्री क्रमांक
जनावरांना काही त्रास झाल्यास किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभागांचा टोल फ्री क्र. १८००-२३३-०४१८ अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. १९६२ यावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.