Nashik Rain Update : दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाचे दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे गुरुवार ता. ७ पासून पुनरागमन झाले असून आज मध्यरात्रीपासून तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून तालुक्यातील प्रमुख नद्या नाल्यांना यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पूर आला आहे.
अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पूलांवरुन वाहात असल्याने अनेक खेडी- पाडयांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पूणेगांव धरणातून विसर्गं करण्यास सुरुवात झाली असून वाघाड धरणही भरण्याच्या मार्गावर असल्याने नदी काठच्या गावांना व वस्तींना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Rivers and canals flood for first time in Dindori taluka Contact with many village lost nashik)
गेल्या दोन ती आठवड्यापासून गायब असलेला पावसाचे जोरदार पुनरागनन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला. पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
काल रात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून यामुळे खरीप पिकांसाठी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने तालुकावासीवर आभाळमाया केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील भात शेतीला पावसाची आवश्यकता होती. दरम्यान मांजरपाडा प्रकल्प, वाघाड, करंजवण, ओझरखेड, पुणेगांव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यात पुणेगाव धरणातून आज दुपारपासून म्हणून नदी पात्रामध्ये निसर्ग करण्यात येत आहे तसेच दुपारी एक वाजेपर्यंत वाघाड धरण हे 90% बंद भरले गेले असून असाच पाऊस सायंकाळपर्यंत चालू राहिल्यास वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने उनंदा व कोलवन नदी लगतच्या गावे व नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
उनंदा नदीस आलेल्या पूरामूळे वणी - फोपशी, देव नदीस आलेल्या पूरामूळे वणी - भातोडे, वणी- जिरवाडे, अहिवंतवाडी आदी गावांचा संपर्क सकाळपासून तुटला आहे.
दोन महिन्यांपासून कोरडेठाक असलेल्या तीसगाव धरणातही पुरपाणी पोहचण्यास सुरुवात झाल्याने तिसगाव धरणावर अवलंबून असलेल्या पंचवीस तीस गांवाना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालखेड धरणातूनही दोन गेट द्वारे कादवा नदी पात्रात विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.