दिंडोरी तालुक्यातील नद्या नाल्यांना पूर, अनेक गांवाचा संपर्क तुटला

flood in dindori taluka latest monsoon update news
flood in dindori taluka latest monsoon update newsesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात सलग चार दिवसांपासून मुसळधार (Heavy rain) व संततधार पावसामूळे (Monsoon) तालुक्यातील सर्वच नद्या - नाले दुतथी भरुन वाहात असल्याने उनंदा, कादवा, देव नदी, आदी नद्यांना पूर आल्याने अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे. (Rivers and streams in Dindori taluka were flooded and many villages were cut off Nashik Monsoon Update news)

हस्तेदुमाला परिसरात उनंदा नदीचे शेतात शिरल्यामूळे पिके वाहून गेले आहे. तर पिंप्री अंचला ते हस्तेदुमाला मार्गावरील उनंदा नदी पूलावर तीन ते चार फुट पाणी असल्याने संपर्क तुटला असून मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी व उनंदा नदीचे पाणी एकत्रीत झाल्याने पाण्याची पातळी वाढून पाणी नदी लगतच्या शेतात शिरले असून अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत.

आंबानेर- जिरवाडे- अहिवंतवाडी मार्गावरील अर्धापुल वाहून गेल्याने व पुलावरुन पाणी असल्याने जिरवाडे, अहिवंतवाडी, तसेच वणी - फोफशी, वणी - भातोडे गावांचा संपर्क तुटला आहे. सुरुवातीचे दोन दिवस असलेली संततधार, भिजपाऊस व त्यानंतर गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसधार पावसामूळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर येत असल्यामुळे तालुक्यातील धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आज सकाळी ९ वाजता पालखेड धरणातून २०७७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला असून मांजरपाडा ( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव ६९.८२% भरले असून पुणेगाव धरणातून आज सकाळी ७ वाजता ४००० क्युसेक्स पाणी उनंदा नदी पात्रात सोडण्यात आले असून त्यांमुळे ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ३८.५०% इतका वाढला आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरण ४४.२२% इतके भरले आहे.

तर वाघाड धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे वाघाड धरण ५४. ४७% इतके भरले आहे. असून तिसगाव धरणामध्ये पूरपाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यात नॉनस्टॉप जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुढील काही तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

flood in dindori taluka latest monsoon update news
Breaking News | नाशिकला पावसाने झोपडले; गुजरातला जोडणारा पूल पाण्याखाली

पावसामुळे अहिवंतवाडी शिवारात घर पडल्याची व विहीर ढासळ्यालीची घटना असून वणी येथील देवनदी तिरावरील बांधकाम साहित्याचे दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. वणी - मुळाने रस्त्यावरील फुलही निम्मा वाहून गेला असून या मार्गावर अवजड वाहतूक धाकेदायक झाली आहे. संगमनेर येथे पिण्याच्या पाण्याचा वापरासाठी हातपंप पाण्यात गेल्याने अशाही स्थितीत महिला पिण्याच्या पाण्यासाठी नाईलाजास्तव हातपंपाचा वापर करीत आहे. संततधार पावसामुळे शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती असून बाजारपेठाही ओस पडल्या आहेत.

flood in dindori taluka latest monsoon update news
इगतपुरीत धुव्वाधार पावसाची बॅटिंग; 132 मिमी विक्रमी पावसाची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()