Nashik News : रस्ता झाला मोठा, पूल ठरला छोटा अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील पांझण नदीवरच्या अरुंद पुलाची झालेली आहे. पांझण नदीवरचा अरुंद अवस्थेतील पूल आता वाहनांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. (road became bigger bridge became smaller Panzhan bridge is becoming death trap Nashik News)
नव्या गुळगुळीत रस्त्याची कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नांदगाव मालेगावच्या दैनंदिन दळणवळणात वाहनांची मोठ्या संख्येने भर पडू लागली असताना मंगळवारी झालेल्या भीषण अपघाताने ब्लॅक स्पॉटचे गालबोट या रस्त्यावरील पांझण पुलाला लागले आहे.
रेल्वेच्या उड्डाणपूल नंतर आता पांझण नदी वरच्या या अरुंद पुलाची भर त्यात पडली आहे. कौळाणे-नगाव ते महाविद्यालय पर्यंत नांदगाव मालेगाव रस्त्याचे अलीकडेच हायब्रीड अॅन्युटीमधून काम करण्यात आले आहे.
हा रस्ता प्रत्यक्षात दहा मीटरचा झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. मराठवाड्यात विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वैजापूर, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
नांदगाव मालेगाव दरम्यान नाग्यासाक्या धरणावर असलेल्या पांझण नदीवर तीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाची उंची पाच मीटर असून त्यात एकूण बारा गाळे असून पुलाची लांबी ८४ मीटर एवढी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पण पुलाची रुंदी सहा ते सात मीटर आहे. हायब्रीड अॅन्युटी मधून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी दहा मीटर अशी ठेवण्यात आल्याने वेगाने धावणाऱ्या वाहनांचा नेमक्या पुलावर याचा अंदाज येत नसल्याचे येथे होत असलेल्या अपघातावरून स्पष्ट झालेले आहे.
यापूर्वी देखील या पुलावर अपघात झाले आहेत. मात्र आजच्या अपघात एवढी तीव्रता त्यात नव्हती. मुळात जीर्ण झालेल्या या पुलाला कठडे नाहीत. कुठेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहने जेव्हा या पुलावर समोरासमोर येतात तेव्हा जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना आपली वाहने काढावी लागत असतात.
सध्या नांदगाव ते मालेगाव दरम्यान वाहनधारकांना सुखाच्या प्रवासाची अनुभूती येत आहे. मात्र याच रस्त्यावर नाग्या साग्या धरणाजवळील असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पांझण नदीवरच्या पुलाला कुठल्याही प्रकारचे कठडे नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न मात्र जैसे थे आहे.
पांझण नदीवरील हा पूल मुळातच जीर्णवस्थेतला आहे. या पुलावर यापूर्वी अनेक अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसविण्यासाठी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.