नाशिक : गंगापूर रोड, कॉलेज रोड, शरणपूर रोड, महात्मा गांधी रोड या प्रमाणेच अशोका मार्गाला समांतर इंदिरानगरकडे जाणारा वडाळा मॉडेल रोड म्हणून विकसित केला जात आहे.
शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई नाका मार्गे सिटी सेंटर मॉल व सिडकोकडे जाणारी वाहतूक या भागातून वळविणे शक्य होईल. त्याचबरोबर द्वारका, मुंबई नाका सर्कलवर होणारा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
शरणपूर रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, अशोका मार्ग हे महत्त्वाचे रस्ते आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. रस्त्यांचा विकास करताना ज्या भागात भविष्यात वाहतूक वाढणार आहे. (Road Development Wadala road model on lines of Ashoka Marg Traffic pressure will be reduced work of Hundred feet road is currently in progress Nashik News)
मुंबई- आग्रा मार्गावर गोविंदनगर येथे सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्याची रुंदी वाढणार आहे. त्यामुळे नव्याने तयार होत असलेल्या शंभर मीटर रस्त्यावर वाहतूक वाढून नाशिक रोडच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना मुंबई नाका मार्गे सिटी सेंटर मॉलकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ दुभाजक टाकले जाणार आहे. या भागात दोन आयटी कंपन्या, टीसीएस, अशोका हॉस्पिटल, हॉटेल व शॉपिंग मॉल असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. त्यामुळे रस्ता विकसित झाल्यावर ही समस्यादेखील मार्गी लागणार आहे.
भाजप सत्ताकाळात तरतूद
सतीश कुलकर्णी महापौर असताना त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभर फूट रस्ता रुंदीकरण व विकास करण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली. त्या निधीतून काम हाती घेण्यात आले आहे. गोविंदनगर बोगदा ते श्रीश्री रविशंकर मार्ग चौफुलीपर्यंत २४ मीटर, तर पुढे बीजेपीनगर मार्गे नाशिक- पुणे महामार्गापर्यंत अठरा मीटरचा रस्ता विकसित केला जाणार आहे.
नागरिकांची वाढती मागणी व या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याने वाहतूक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोका मार्ग प्रमाणेच मॉडेल रोड तयार करण्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला कामाला सुरवात झाली आहे.
त्या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने सध्या गोविंदनगर ते श्रीश्री रविशंकर मार्ग असा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकने जाणारा रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बारा ते पंधरा मीटर रस्ता विकसित आहे. आता नव्याने शंभर फुटी रस्ता तयार होत आहे.
सतीश कुलकर्णी, माजी महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.