Road Damage: कॉलेज स्टॉप ते रावळगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे! वाहन वर्दळीमुळे दुभाजकांची स्थानिकांची मागणी

Potholes in front of RBH School between College Stop to Rawalgaon Naka in Malegaon City.
Potholes in front of RBH School between College Stop to Rawalgaon Naka in Malegaon City.esakal
Updated on

Road Damage : शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे जोरदार असून सर्वत्र सिमेंटचे रस्ते बनविण्यात येत आहेत. शहरातील वर्दळीचा असलेल्या कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका या प्रमुख रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहन चालकांची तारांबळ उडते.

या भागातून महाविद्यालयातील व शाळकरी विद्यार्थी यांच्यासह कॅम्प भागासह, नामपूर रोड व काटवन भागात जा ये करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Road from College Stop to Rawalgaon full potholes Local demand for dividers due to vehicular traffic nashik news)

दरम्यान हा रस्ता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असल्याने शाळा, महाविद्यालय सुट्टी होण्याच्या व भरण्याच्या काळात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे दुभाजकांची गरज आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने खड्डे टाळण्याच्या नादात छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे.

कॅम्प भागाला शहराशी जोडणारा हा मुख्य रस्ता असून त्याचीच दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वरिष्ठ महाविद्यालय, लॉ कॉलेज, इंग्लिश स्कूल, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय असल्याने पालकांना मुलांना शाळेत सोडायला यावे लागते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Potholes in front of RBH School between College Stop to Rawalgaon Naka in Malegaon City.
Nashik: प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर 17 गुन्हे दाखल! सिडकोत व्यावसायिकांकडून 82 हजारांचा दंड वसूल

त्यामुळे सकाळच्या सुमारास, दुपारी बाराच्या सुमारास व सायंकाळी पाच नंतर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यावर दुभाजकांची व्यवस्था करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे.

रावळगाव नाका भागात रस्त्यालगतच व्यावसायिकांची दुकाने असल्याने सायंकाळी सहानंतर रोजची वर्दळ ही वाहतूकीसाठी अडथळा ठरते. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास दुभाजकांचे काम करून कॅम्प पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या भागात सायंकाळी रावळगाव नाक्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Potholes in front of RBH School between College Stop to Rawalgaon Naka in Malegaon City.
SAKAL Workshop : प्रात्यक्षिकांसह जाणून घ्या व्यावसायिक मसाले बनविण्याचे तंत्र! या तारखांना मिळेल प्रशिक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.