Nashik news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जाहीर होताच विमानतळ रस्त्याला चकाकी आली. रस्त्याच्या दुभाजकाला रंगरंगोटी करून आजूबाजूला साफसफाई करण्यात आली. प्रवास सुखकर होईल, याची दक्षता घेण्यात आली.
यानिमित्त विमानतळाला जोडणाऱ्या अक्राळे रस्त्याची दुरुस्तीही सुरू झाली. (Road work closed after Prime Minister visit in nashik news)
मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामांवर ग्रामस्थांनी हस्तक्षेप घेताच त्या रस्त्याची दुरुस्ती थांबविण्यात आली. आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची वाट पाहावी लागेल का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी एक कोटी ६० रुपये मंजूर झाले.
ठेकेदाराने त्या पैशांतून रस्त्याचे एकाच बाजूचे काम केले. निधी संपल्यानंतर काम बंद केले होते. मात्र, पंतप्रधान मोदी येणार असल्याने रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र, ग्रामस्थांनी कामाची पाहणी करून ठेकेदरांच्या माणसाला अंदाजपत्रकाबाबत विचारणा केली. मात्र, ठेकेदराच्या माणसाकडून कुठलीही माहिती मिळाली नाही. कामावर हरकत घेतल्याने रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर विमानतळ ते अक्राळे रस्त्यावरील अक्राळे शिवारात रस्त्याची डागडुजी सुरू केली. मात्र, ते अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावरील डांबराचा थर अल्प प्रमाणात टाकून रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्यावरील डांबर हाताने निघून येत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेताच संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती थांबवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पूर्ण झाल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही या रस्त्याला आवश्यक निधी प्राप्त झालेला नाही. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने ‘तारीख पे तारीख’ दिली.
पंतपधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरू झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला निकृष्ट कामामुळे ‘खो’ मिळाला असून, नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाला घेतलेल्या आक्षेपामुळे बंद पडलेले काम त्वरित सुरू करून दर्जात्मक रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
''पंतप्रधान मोदी यांच्या आगमनामुळे सभास्थळापर्यंतचे रस्ते चकाकले. विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्षच झाले. निकृष्ट सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी आक्षेप घेतल्याने रस्त्याचे काम थांबविण्यात आले. पंतप्रधानांचा दौरा संपल्याने आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पुढील दौऱ्याची वाट बघावी लागेल का? -पांडुरंग गायकवाड, ग्रामस्थ, अक्राळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.