सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेदला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण टाकेद-धामणगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या जीवघेण्या खड्डेमय रस्त्याची मोठी दुरवस्था असल्याने व पर्यायाने दुसरा मार्ग नसल्याने या भागातील स्थानिक प्रवासी, वाहनधारक, शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व्यावसायिक जीव घेऊन प्रवास करीत आहेत.
हा रस्ता चार पाच वर्षांपासून प्रलंबित असून मंजुरीनंतर रस्त्याचे उद्घाटनही झाले, पण प्रत्यक्षात मुहूर्त कधी लागले याची कुणालाही शाश्वती नाही. (Road work will not start even after Bhumi Pujan twice Condition of Taked Dhamangaon road Nashik News)
या रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात वेळोवेळी ग्रामस्थांनी आवाज उठवला. अनेकदा लोकप्रतिनिधींकडे देखील मागणी केली. या चार किमीच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी पाच कोटी ५३ लाखांचा निधी गेल्या चार महिन्यांपासून मंजूर आहे. १ ऑक्टोबर २०२२ ला या रस्त्याच्या कामाचे खासदार हेमंत गोडसे यांनी भूमिपूजन करत धामणगाव टाकेद फाट्यावर मंजूर रस्ता फलक, मंजूर निधी, कामाची मुदत असा भूमिपूजनाचा फलकही लावला.
या रस्त्याचे कामकाज मक्तेदार बी. टी. कडलग कनस्ट्रक्शन प्रा. लि नाशिक यांना देण्यात आले आहे. यानंतर याच मंजूर रस्त्याचे १९ नोव्हेंबर २०२२ ला सायंकाळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी फलक लावत भूमिपूजन केले. मात्र आजपर्यंत या रस्त्याचे काम चालू झाले नाही.
१० डिसेंबरला अडसरे खुर्द गिरंगेवाडी फाट्या जवळपास या रस्त्याच्या कामाला एकाकी अचानक सुरुवात करण्यात आली, यात कोरडे काँक्रीट मटेरिअल वापरून शंभर दोनशे मीटर अंतराचा एक बाजूचा कच्चा रस्ता दिखावा म्हणून तयार करण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर ते आजपर्यंत या रस्त्याचे काम प्रलंबित राहिले आहे. आमदार खासदार यांनी या रस्त्याप्रश्नी श्रेयवाद करण्यापेक्षा रस्त्याचे उत्तम दर्जाचे आणि लवकर कसे होईल हे पाहावे, प्रत्यक्षात कामाला सुरुवात केव्हा असा प्रश्न स्थानिक जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
"टाकेद-धामणगाव रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर आहे. विद्यमान खासदार, आमदार यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले, त्याला अनेक दिवस उलटून गेले. मंजूर रस्त्याचे फलक हे फक्त नावालाच लावलेले आहेत. परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही याची शोकांतिका वाटते." - संग्राम पाटील, एसएमबीटी कर्मचारी
"भूमिपूजन झाल्यानंतर आजपर्यंत या जीवघेण्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्याने या परिसरातील प्रवासी-वाहनधारक, नोकरदार वर्ग, उद्योग व्यावसायिक, चाकरमानी, ग्रामस्थ नागरिका वैतागले आहेत. त्वरित कामाला सुरवात करावी."- अँड. दिलीप बांबळे, टाकेद.
"रस्त्याच्या मध्यभागी टाकलेल्या सुक्या काँक्रीटमुळे अपघात होत आहेत. खडीवरून दुचाकी चालविणे अवघड झाले आहे. रात्री अपरात्री उपचारासाठी प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. येत्या महाशिवरात्रीच्या दरम्यान तरी हा रस्ता पूर्ण होईल का असा प्रश्न स्थानिकांसमोर पडला आहे." - किरण साबळे, मनसे गटनेते, अडसरे बु.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.